
Latur News: मांजरा परिवारातील पहिल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूकही बिनविरोध पार पडत आहे. यानिमित्ताने परिवारातील तिसऱ्या कारखान्याचीही निवडणूक बिनविरोध होत असून, मांजरा कारखान्याच्या २१ संचालकांच्या जागेसाठी होत असलेल्या निवडणुकीत २१ उमेदवारांनी दाखल केलेले अर्ज बुधवारी (ता. दोन) झालेल्या छाननीत वैध झाले आहेत. सत्ताधारी पॅनेलच्या विरोधात एकही अर्ज न आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली असून, १७ एप्रिलच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदतीनंतर निवडीची अधिकृत घोषणा होणार आहे.
मांजरा परिवाराचे मार्गदर्शक माजीमंत्री दिलीपराव देशमुख यांनी सुरुवातीपासून परिवारातील सर्व सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका बिनविरोध पार पाडण्यासाठी प्रयत्न केले. यातूनच त्यांनी शेतकरी संघटनांसह विविध घटकांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकाही घेतल्या. त्याचा परिणाम तीनही कारखान्याच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत.
पहिल्यांदा विलास व त्यानंतर रेणा कारखान्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मोजक्याच कार्यकर्त्यांनी पोकळ विरोध करत उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, या सर्वांचे अर्ज छाननीत बाद झाल्यामुळे दोन्ही कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत. विलास कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत गुरुवारी (ता. तीन) संपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी संचालक मंडळाची बिनविरोध निवड जाहीर केली.
रेणा कारखान्याचीही याच पद्धतीने निवड जाहीर होईल. दरम्यान, मांजरा कारखान्याच्या निवडणुकीत २५ मार्च ते एक एप्रिल दरम्यान २१ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. मुदत एकवीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले. बुधवारी झालेल्या छाननीत सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यानंतर गुरुवारी (ता. तीन) निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) संगमेश्वर बदनाळे यांची निवडणूक लढवणाऱ्या वैध उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर २१ जागांसाठी २१ उमेदवार उरल्याने कारखान्याची निवडणूक बिनविरोध पाडणार आहे. त्याची औपचारिक घोषणा १७ एप्रिलनंतरच होणार आहे.
बिनविरोध आलेले संचालक मंडळ
बिनविरोध निवडून येणाऱ्या संचालक मंडळात उत्पादक सहकारी संस्था गटातून विद्यमान अध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख, गाधवड गटातून आमदार अमित देशमुख, मदन भिसे व नवनाथ काळे, चिखुर्डा गटातून अशोक काळे, वसंत उफाडे व कैलास पाटील, बाभळगाव गटातून धनराज दाताळ, तात्यासाहेब देशमुख व ज्ञानेश्वर पवार, आलमला गटातून भैरू कदम, विद्यमान उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे व सदाशिव कदम,
चिंचोलीराव वाडी गटातून नीलकंठ बचाटे, सचिन शिंदे व दयानंद बिडवे, महिला गटातून निर्मला चामले व छायाबाई कापरे, इतर मागासवर्गीय गटातून शंकर बोळंगे, अनुसूचित जाती गटातून अनिल दरकसे तर भटक्या विमुक्त जाती गटातून बाळासाहेब पांढरे यांचा समावेश आहे. नूतन संचालक मंडळात पाच नवीन चेहरे देण्यात आले असून १६ विद्यमान संचालकांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.