Mandeshi Festival: माणदेशी महोत्सवाचा सांस्कृतिक क्षेत्रात ठसा

Mandeshi Culture: ‘‘माणदेशाचे सांस्कृतिक वैभव मुंबईच्या सांस्कृतिक क्षेत्रात निराळा ठसा उमटवणारे आहे. या महोत्सवामुळे महाराष्ट्राची खासकरून माणदेशातील संस्कृती सातासमुद्रापार पोहोचण्यास मदत होईल.
Mandeshi Festival
Mandeshi FestivalAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: ‘‘माणदेशाचे सांस्कृतिक वैभव मुंबईच्या सांस्कृतिक क्षेत्रात निराळा ठसा उमटवणारे आहे. या महोत्सवामुळे महाराष्ट्राची खासकरून माणदेशातील संस्कृती सातासमुद्रापार पोहोचण्यास मदत होईल. माणदेशातील भगिनींचे हे काम कौतुकास्पद आहे,’’ असे गौरवोद्‍गार सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांनी काढले.

परळ येथील नरे पार्कमध्ये नऊ फेब्रुवारीपर्यंत माणदेशी फाउंडेशनच्या वतीने ‘माणदेशी महोत्सव-२०२५’चे आयोजन केले आहे. सांस्कृतिकमंत्री शेलार यांच्यासह ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी माणदेशी फाउंडेशनच्या संस्थापिका चेतना गाला सिन्हा यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

Mandeshi Festival
Agriculture Festival : परभणीत १४ फेब्रुवारीपासून जिल्हा कृषी महोत्सव

मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, की ‘माणदेशी महोत्सव-२०२५’च्या निमित्ताने पुन्हा एकदा माण भागाशी जोडला गेलो. भविष्यात माझ्याकडे मंत्रिपद असेल नसेल; पण तुमच्या या जयाभाऊचे माणदेशासोबतचे नाते कायमस्वरूपी राहणार आहे.

संस्थापिका सिन्हा म्हणाल्या, की लोक संस्कृतीचा, लोककलेचा आणि ग्रामीण महिलांना शहरी बाजारपेठ देण्याचा तसेच महिलांना स्वयंसिद्ध करण्याच्या माणदेशी फाउंडेशनचा उद्देशाची मार्गक्रमण योग्य दिशेने सुरू आहे. त्याचे फलित म्हणजे माणदेशी फाउंडेशनने १० लाख महिलांच्या सक्षमीकरणाचा टप्पा गाठलेला आहे.

Mandeshi Festival
Rice Festival: ‘महाएफपीसी’तर्फे गुलटेकडी येथे तांदूळ महोत्सव सुरू

न्यायमूर्ती धर्माधिकारी म्हणाले, की २० वर्षांपूर्वीचा माण खटाव आता खूप बदलला आहे. शहरातल्या या दोघांनी माणसारख्या भागातील कित्येकांचे आयुष्य उभे केले. दुष्काळासारख्या प्रतिकूल परिस्थितीत नव्या उमेदीने कसे लढावे याचा आदर्श घेत शहरातील लोकांनी निराशा झटकली पाहिजे.

या प्रसंगी माणदेशी फाउँडेशनने १० लाख महिलांच्या सक्षमीकरणाचा टप्पा गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्या निमित्ताने काही महिलांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार चित्रा वाघ, एचएसबीसी बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी रोमीत सेन आदी मान्यवर उपस्थित होते. महोत्सवात धनगरी गजनृत्य आणि माणदेशी रेडीओच्या आरजे केराबाई आणि त्यांच्या टीमने गायलेल्या ओव्यांना प्रतिसाद मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com