Kharif Season: खरीप पिकातील प्रमुख तणांचे व्यवस्थापन

Weed Management: खरीप हंगामातील प्रमुख तणांच्या व्यवस्थापनासाठी योग्य तणनाशकाची निवड अत्यंत आवश्यक असते. योग्य मात्रेत तणनाशकाचा वापर केल्यास प्रभावी तण व्यवस्थापन होते.
Weed Management
Weed ManagementAgrowon
Published on
Updated on

डॉ. व्ही. व्ही. गौड

Kharif Crop Management: विविध पिकांमध्ये तणांच्या प्रादुर्भावामुळे सर्वाधिक नुकसान होते. मुख्य पिकासोबत तणे ही पाणी, अन्नद्रव्ये आणि जागेसाठी स्पर्धा करतात. त्यामुळे पीक उत्पादनात देखील मोठी घट येते. त्यासाठी वेळीच तणांचे नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक असते. मजूर उपलब्धता आणि वाढत्या मजुरी खर्चामुळे तण नियंत्रण वेळेत करणे शक्य होत नाही. त्यासाठी तणनाशकांचा वापर हा प्रभावी उपाय ठरतो.

विविध पीक पद्धतीत प्रभावी तण व्यवस्थापनासाठी तणांचा जीवनक्रम, पानांच्या रुंदीनुसार, परोपजीवी तणे इत्यादी बाबी माहिती असणे आवश्यक आहे. तणांच्या योग्य अवस्थेत तणनाशकाचा योग्य मात्रेत वापर केल्यास प्रभावी तण व्यवस्थापन होते. खरीप पिकांमध्ये प्रामुख्याने गवतवर्गीय तणांमध्ये हराळी, जंगली धान (सावा), शिंपी, लोना, रान नाचणी इ., रुंद पानी तणांमध्ये केना, दुधी, गाजर गवत, कोंबडा, दीपमाळ इत्यादी तसेच बहुवार्षिक तणांमध्ये लव्हाळा इत्यादी तणांचा समावेश होतो.

शेतातील जास्त घनतेत उपलब्ध तणांचे कमी खर्चात प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी योग्य तणनाशकांची निवड करणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक तणनाशकाची तण व्यवस्थापन करण्याची क्षमता ही वेगळी असते. उदा. क्विझालोफॉप ईथाईल किंवा प्रोपाक्विझाफोप ही तणनाशके फक्त गवतवर्गीय तणांचे व्यवस्थापनासाठी उपयोगी आहेत, त्यांच्या माध्यमातून कोणत्याही रुंद पानी तणांचे व्यवस्थापन होत नाही. दुसरीकडे काही तणनाशकाच्या माध्यमातून दोन्ही प्रकारच्या तणांचे व्यवस्थापन करता येते (उदा. इमॅझिथायपर). अलीकडे मिश्र तणनाशकाच्या उपलब्धतेमुळे विस्तृत तणांचे व्यवस्थापन करणे शक्य झाले आहे. खरीप हंगामातील प्रमुख तणांच्या व्यवस्थापनासाठी योग्य तणनाशकाची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे.

लव्हाळा

हे तण सर्वात कठीण बारमाही तणांपैकी एक आहे. या तणामुळे मका, ऊस आणि कापूस सारख्या उन्हाळी पिकांत उत्पादनात मोठी घट येते.

या जांभळ्या रंगाच्या कंद (गाठ) असलेल्या लव्हाळा वनस्पतीमध्ये जमिनीच्या खाली एक मातृ कंद असतो. या मातृ कंदामधून कंदाची एक साखळी तयार होऊन ती जमिनीत ६० सेंमी खोलवर पसरते.

Weed Management
Weed Management: मका पिकातील तण व्यवस्थापन

या तणाचा प्रसार कंदापासून वेगाने होतो. तुलनेने बियाद्वारे होणारा प्रसार खूप कमी असतो (२ ते १० टक्के).

या लव्हाळा तणापासून वाढी दरम्यान पहिल्या एका महिन्यात, एका मातृ कंद चार कंद तयार करू शकते. तीन महिन्यांत कंदांची संख्या साधारणपणे १०० पर्यंत पोहोचू शकते.

धान (रोवणी)

उगवणपश्‍चात : (प्रमाण : प्रति एकर)

बिस्पायरिबॅक सोडिअम (१० टक्के एस.सी.) १०० मिलि

वापर : रोपवाटिका व रोवणी धानात १० ते १५ दिवसानंतर तसेच पेरीव धानामध्ये २० दिवसानंतर किंवा

क्लोरीमुरॉन ईथाइल

(२५ टक्के डब्ल्यू.पी.) १० ग्रॅम

वापर ः रोवणीनंतर ५ ते १० दिवसांनी.

सोयाबीन

उगवणपश्‍चात : (प्रमाण : प्रति एकर)

क्लोरीमुरॉन ईथाइल (२५ टक्के डब्ल्यू.पी.) १५ ग्रॅम

वापर : पेरणीनंतर १५ दिवसांनी. किंवा

इमॅझिथायपर (१० टक्के एस.एल.) ४०० मिलि

वापर : पेरणीनंतर ७ ते १४ दिवसांनी.

कपाशी

उगवणपश्‍चात : (प्रमाण : प्रति एकर)

ग्लुफोसिनेट अमोनिअम (१३.५ टक्के एसएल) १००० मिलि

वापर : पेरणीनंतर ४० दिवसांनी (पंपाला संरक्षित कवच लावून दोन ओळींत फवारणी करावी).

तूर, मूग, उडीद

उगवणपश्‍चात : (प्रमाण : प्रति एकर)

इमॅझिथायपर (१० टक्के ई.सी.) ३०० मिलि

वापर : पेरणीनंतर ७ ते १४ दिवसांनी.

उन्हाळी हंगामात खोल नांगरणी करावी किंवा धैंचा पिकाची लागवड करावी.

Weed Management
Weed Management: तणकटाची वाढती कटकट

दुधी

या वार्षिक तणाचा प्रसार बियाद्वारे होतो व एका वर्षात चार जीवनचक्र पूर्ण करते. प्रजातींमध्ये दुधाळ पांढऱ्या पदार्थामुळे तणनाशकांचा वापर करून त्यांचे नियंत्रण करणे आव्हानात्मक आहे, जे तणनाशकांच्या परिणामकारकतेमध्ये व्यत्यय आणून तणनाशकाचे विघटन करू शकतात.

सोयाबीन

उगवणपश्‍चात : (प्रमाण : प्रति एकर)

इमॅझिथायपर (१० टक्के ईसी) ४०० मिलि

वापर : ७ ते १४ दिवसांनी

भुईमूग

उगवणपश्‍चात : (प्रमाण : प्रति एकर)

इमॅझिथायपर (१० टक्के ईसी) ४०० ते ६०० मिलि

वापर : ७ ते १४ दिवसांनी.

तूर, मूग, उडीद

उगवणपश्‍चात : (प्रमाण : प्रति एकर)

इमॅझिथायपर (१० टक्के ईसी) ३०० मिलि

वापर : ७ ते १४ दिवसांनी

केना तण

हे एक व्यापक अनेक फांद्या असलेले तण असून फांद्या जमिनीवर आणि जमिनीखाली वाढतात. या तणाचे जीवनचक्र ४० ते ४५ दिवसांमध्ये पूर्ण होते. उष्णकटिबंधीय, समशीतोष्ण हवामानात चांगली वाढ होते.

जलद पुनरुत्पादनामुळे आणि फांद्याच्या तुकड्यांमधून पुन्हा निर्माण होण्याची क्षमता असल्यामुळे हे तण नियंत्रित करणे कठीण आहे.

धान

उगवणपश्‍चात : (प्रमाण ः प्रति एकर)

बिस्पायरिबॅक सोडिअम

(१० टक्के एससी) १०० मिलि किंवा

वापर : पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी.

मेटसल्फुरॉन मिथाईल

(१० टक्के डब्ल्यूपी) ८ ग्रॅम

वापर : रोवणीनंतर १५ ते २०दिवसांनी.

Weed Management
Kharif Sowing : अमरावती जिल्ह्यात खरीप पेरा ८२ टक्के क्षेत्रावर

तूर, मूग, उडीद

उगवणपश्‍चात : (प्रमाण ः प्रति एकर)

इमॅझिथायपर (१० टक्के ईसी)

३०० मिलि

वापर : ७ ते १४ दिवसांनी.

सोयाबीन

उगवणपश्‍चात : (प्रमाण : प्रति एकर)

क्लोरीमुरॉन इथाइल (२५ टक्के डब्ल्यूपी) १५ ग्रॅम किंवा

वापर : पेरणीनंतर १५ दिवसांनी.

फ्लुथियासेट मिथाइल (१०.३ टक्के ई.सी.) ५० मिलि किंवा

इमाझिथायपर (१० टक्के ईसी)

४०० मिलि किंवा

वापर : ७ ते १४ दिवसांनी.

इमॅझिथायपर (७० टक्के डब्ल्यूजी) ४० ग्रॅम

कापूस

उगवणपश्‍चात : (प्रमाण : प्रति एकर)

ग्लुफोसिनेट अमोनिअम (१३.५ टक्के) १००० मिलि

वापर : पेरणीनंतर ४० दिवसांनी (पंपाला संरक्षित कवच लावून दोन ओळींत फवारणी करावी).

भुईमूग

उगवणपश्‍चात : (प्रमाण : प्रति एकर)

इमॅझिथायपर (१० टक्के ईसी) ४०० ते ६०० मिलि

वापर : ७ ते १४ दिवसांनी.

ऊस

उगवणपश्‍चात : (प्रमाण : प्रति एकर)

मेटसल्फ्युरॉन मिथिल (१० टक्के डब्ल्यूपी) १२ ग्रॅम

वापर : लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी.

दीपमाळ

हे वार्षिक तण असून आर्द्र, समशीतोष्ण आणि उष्णकटिबंधीय प्रदेशात वाढते. या तणाचा प्रसार बियांमार्फत होतो.

सोयाबीन

उगवणपश्‍चात (प्रमाण : प्रति एकर)

क्लोरीम्युरॉन इथाइल

(२५ टक्के डब्ल्यूपी) १५ ग्रॅम किंवा

फ्लुथियासेट मिथाइल

(१०.३ टक्के ई.सी.) ५० मिलि

वापर :पेरणीनंतर १५ दिवसांनी.

विंचू

हे वार्षिक तण असून या तणाचा प्रसार जमिनीवर सरपटणाऱ्या फांद्याच्या तुकड्याद्वारे आणि बियाद्वारे होतो.

धान

उगवणपश्‍चात ः (प्रमाण ः प्रति एकर)

मेटसल्फ्युरॉन मिथाइल

(२० टक्के डब्ल्यूपी) ८ ग्रॅम

सोयाबीन, तूर, मूग, उडीद,

भुईमूग :

उगवणपश्‍चात (प्रमाण : प्रति एकर)

इमॅझिथायपर (१० टक्के इसी) ३०० ते ४०० मिलि

वापर : ७ ते १४ दिवसांनी.

गाजर गवत

हे वार्षिक तण ‘काँग्रेस’ या नावाने ओळखले जाते. या तणाची पाने गाजराच्या पानांसारखी दिसत असल्यामुळे हे गाजर गवत नावाने प्रसिद्ध आहे.

या तणाचा प्रसार बियामार्फेत होतो. एका झाडापासून सुमारे ५ हजार ते २५ हजार बी तयार होतात.

आकाराने अत्यंत लहान आणि वजनाने हलक्या असतात.

हे तण विषारी असून याच्या संपर्कात आल्यास ॲलर्जी होते.

सोयाबीन

उगवणपश्‍चात (प्रमाण : प्रति एकर)

क्लोरीम्युरॉन इथाइल (२५ टक्के डब्ल्यूपी) १५ ग्रॅम किंवा

वापर : पेरणीनंतर १५ दिवसांनी.

फ्लुथियासेट मिथाइल (१०.३ टक्के ई.सी.) ५० मिलि

वापर : पेरणीनंतर १५ दिवसांनी.

मका

उगवणपश्‍चात (प्रमाण : प्रति एकर)

टोप्रामेझोन ३० मिलि

वापर : पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी

ऊस

उगवणपश्‍चात (प्रमाण ः प्रति एकर)

मेटसल्फ्युरॉन मिथाइल (२० टक्के डब्ल्यूपी) १२ ग्रॅम

वापर ः १० ते १५ दिवसांनी.

कोंबडा

हे वार्षिक तण विशेषतः पेरिव धान, ज्वारी आणि मक्यात जास्त आढळते.

जमिनीत या तणाचा प्रादुर्भाव जास्त आढळतो.

या तणांचा प्रसार बियाण्यांद्वारे होतो.

साधारणपणे १० ते १२ आठवड्यांत जीवनचक्र पूर्ण करते.

सोयाबीन

उगवणपश्‍चात (प्रमाण ः प्रति एकर)

क्लोरीमुरॉन इथाईल (२५ टक्के डब्ल्यूपी) १५ ग्रॅम

वापर ः पेरणीनंतर १५ दिवसांनी.

कापूस

उगवणपश्‍चात (प्रमाण ः प्रति एकर)

पायरिथिओबॅक सोडिअम (१० टक्के ईसी) ३०० मिलि

मका

उगवणपश्‍चात (प्रमाण : प्रति एकर)

टोप्रामेझोन ३० मिलि

वापर : पेरणीनंतर २० ते २५

दिवसांनी

चांदवेल

हे व्यापक बहुवार्षिक तण असून, त्याची मुळांची वाढ मजबूत असते. या तणाचा प्रसार बिया, फांद्याच्या तुकड्याद्वारे होतो.

मका

उगवणपश्‍चात (प्रमाण ः प्रति एकर)

टोप्रामेझोन ३० मिलि

वापर : पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी

ऊस

उगवणपश्‍चात (प्रमाण : प्रति एकर)

मेटसल्फ्युरॉन मिथाइल (२० टक्के डब्ल्यूपी) १२ ग्रॅम किंवा

गवतवर्गीय तणे (सावा, लोना, शिंपी, रान नाचणी)

(टीप : तणनाशक फवारणीवेळी व्यापारी घटकासोबत मिळत असलेल्या प्रसारक द्रव्याचा वापर अवश्य करावा. लेबलक्लेम शिफारशी आहेत.)

- डॉ. व्ही. व्ही. गौड, ८६३७७०७६४५

(प्रमुख अन्वेषक, अखिल भारतीय तण व्यवस्थापन संशोधन प्रकल्प, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com