Agricultural Warehouse: गोदामामध्ये शेतीमाल ठेवताना काय काळजी घ्यावी?

गोदामात कीडग्रस्त साठा येणार नाही याची काळजी घ्यावी. ज्या साठ्याचे गुणधर्म एकत्र जुळत नाही तो साठा एकत्र ठेवू नये. केंद्रप्रमुखाने महिन्यातून एकदा गोदामातील सर्व साठ्यांची मोजदाद रेकॉर्डप्रमाणे करावी.
Agricultural Warehouse
Agricultural WarehouseAgrowon

Agricultural Warehouse : संमिश्र साठ्याची साठवणूक (Storage) करताना नियमावलीचे पालन करावे. ज्या साठ्याचे गुणधर्म एकत्र जुळत नाही तो साठा एकत्र ठेवू नये. साखर (Sugar) किंवा गूळ (Jaggery) इतर धुरीकरण करण्यात येणाऱ्या पदार्थांसोबत ठेवू नये. खत हे धान्य किंवा साखर किंवा कापसाबरोबर (Cotton) ठेवू नये.

ज्वालाग्राही व अतिज्वालाग्राही पदार्थ इतर साठा जो ज्वालाग्राही नाही त्याच्याबरोबर ठेवू नये. धुरीकरण करण्यात येणारा व ज्याला धुरीकरणाची गरज नाही असा साठा एकत्र ठेवू नये. मसाल्याचे पदार्थ इतर साठ्यांबरोबर ठेवू नयेत.

आटा, मैदा, रवा, सुजी इत्यादी पदार्थ मसाल्याच्या पदार्थांबरोबर ठेवू नयेत. सिमेंट, खत इतर खाद्यपदार्थांबरोबर ठेवू नये. ज्या पदार्थांचा विमा जास्त किमतीचा आहे, तो कमी विमा असलेल्या पदार्थांबरोबर करू नये.

धान्याच्या थप्पीसाठी डनेजचा वापर ः

१. धान्याच्या थप्पीवरील लाकडी किंवा पॉलिपॅलेट्‌सचा वापर करणे सर्वोत्तम ठरेल.

२. साखर किंवा खताच्या थप्पीखाली दोन चटया आणि मध्ये पॉलिथिन शीट वापरावे.

३. खाद्यान्नाच्या थप्पीवर लाकडी क्रेट नसतील तर दोन थर बांबू मॅटमध्ये १०० मायक्रॉनचे पॉलिथिन शीट वापरावे.

४. तेल व इतर पातळ पदार्थाच्या खाली लोखंडी ट्रे वापरावेत.

५. जर वर नमुद केलेले घटक उपलब्ध नसतील तर लॅमिनेशन शीट्स, पॉलिपॅलेट्‌सचा वापर करावा.

Agricultural Warehouse
Agriculture Warehouse : गोदाम कामकाज स्वीकृत कार्यप्रणाली

क्वारंटाइन धुरीकरण करण्याची पध्दत ः

१. गोदामात कीडग्रस्त साठा येणार नाही याची काळजी घ्यावी.

२. जर कीडग्रस्त साठा साठवणुकीस आला तर तो रिकाम्या गोदामात उतरवून त्याचे ताबडतोब धुरीकरण करून घ्यावे.

३. जो साठा कीडमुक्त झाला असेल, तो स्वीकारून त्याची थप्पी मारावी.

४. क्वारंटाइन धुरीकरण एका वेगळ्या कप्प्यात करावे.

साठवणुकीस आलेला साठा शास्त्रशुद्ध पद्धतीने सांभाळणे आणि गोदामाची स्वच्छता ः

१. गोदामाची नियमीत स्वच्छता करावी. सांडपाणी जाण्यासाठी व्यवस्था असावी.

२. केंद्रप्रमुख गोदामात फिरून कुठून गळती होते का किंवा एखादी गॅप असेल तर त्यावर लक्ष ठेवतील. खिडकी किंवा झरोक्यातून पावसाने पाणी किंवा पक्षी येणार नाही यावर लक्ष ठेवतील.

३. भिंतीला किंवा जमिनीला जर भेगा असतील तर त्यांची दुरुस्ती साठा साठवणूक ठेवण्यापूर्वी करावी.

४. धुरीकरण किंवा फवारणी नेमून दिलेल्या परिमाणाप्रमाणे करतील.

५. गोदामे धुऊन, त्यानंतर वाळवून मगच धान्याचा साठा स्वीकारला जाईल.

६. सर्व गोदामे अगोदर धुऊन स्वच्छ करून वाळवावीत. त्यानंतर शेतीमालाचा साठा करावा.

७. गोदामाच्या भोवती वाढलेली झाडेझुडपे ठरावीक काळानंतर काढावीत. परिसरात उंदरांची बिळे नष्ट करावीत. सरपटणारे प्राणी येणार नाहीत याची काळजी घ्यावी.

८. खेळती हवा राहण्यासाठी काही वेळा गोदामाचे दरवाजे उघडे असावेत.

९. गोदामात एक्झॉस्ट पंखे बसविल्यास दरवाजे उघडे ठेवावेत. खिडक्या उघड्या ठेवाव्यात. त्यामुळे गोदामात खेळती हवा राहते.

अंतर्गत साठ्याची निगा ः

१. केंद्रप्रमुखाने दर पंधरा दिवसांनी साठ्याचा नमुना काढून त्यात कीड आहे की नाही हे तपासावे.

२. दर पंधरवड्यांनी तपासणी केल्यावर त्याची स्टॉककार्डवर नोंदणी करावी.

३. गोदामात नियमित फवारणी करावी, म्हणजे कीड एका गटातून दुसऱ्या गटात जाणार नाही.

४. तपासणीदरम्यान कीड आढळल्यास त्वरित धुरीकरण करावे.

५. एखाद्या गटात जर आर्द्रता जास्त असेल तर अशा गटाला भरपूर हवा मिळण्यासाठी प्रयत्न करावा.

६. गोदामाची नियमाने पाहणी करून भिंती, तळघर, खिडक्या दरवाजे सुस्थितीत आहे की नाही याची पाहणी करावी.

७. गोदामात सांडलेला पाला गोळा करून तो साफ करावा. मूळ गटाच्या पोत्यांबरोबर निर्गमित करावा.

गोदामातील पोत्यांची मोजणी ः

१) केंद्रप्रमुखाने महिन्यातून एकदा गोदामातील सर्व साठ्याची मोजदाद रेकॉर्डप्रमाणे करावी.

२) साठ्यात कमी किंवा जास्त पोती असतील तर त्याची नोंद करावी. पोती जुळवून घ्यावीत.

गोदामातील साठ्याची वर्गवारी ः

गोदामातील साठ्याची किडीमुळे किती नुकसान झाले याची ५०० ग्रॅम नमुना काढून चाळल्यानंतर त्याची वर्गवारी करावी.

अनु. क्र. ---वर्ग ---निरीक्षण

१---स्वच्छ---५०० ग्रॅम नमुना काढल्यावर त्यात कीड आढळली नाही.

२---कमी---५०० ग्रॅम नमुना तपासल्यावर एक किंवा दोन किडे आढळले.

३---जास्त ---५०० ग्रॅम नमुना तपासल्यावर २ पेक्षा अधिक किडे सापडणे.

Agricultural Warehouse
Warehouse Scheme : शेतकरी कंपन्यांना गोदाम पावतीआधारे व्यवसाय उभारणी

वखार केंद्रावरील साठ्याचे किडीपासून संरक्षण ः

वखार केंद्रप्रमुखाने केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या कीडनाशकांचा उपयोग करून वखार केंद्रातील साठा कीड व उंदरांपासून मुक्त ठेवावा.

१. वखार केंद्रावरील साठा कीडमुक्त ठेवण्यासाठी धुरीकरण व फवारणी करावी.

२. केंद्रप्रमुख वखार केंद्रावर साठा कीडमुक्त ठेवण्यासाठी पंधरा दिवसांतून एकदा शिफारशीत कीटकनाशकाची फवारणी करतील.

३. वखार केंद्रातील परिसरात उंदीर नियंत्रणासाठी पिंजरा आणि उंदीरनाशकांचा वापर करावा.

४. गोदामात सांडलेला गहू, तांदूळ वेळोवेळी गोळा करावा. गोदामात स्वच्छता ठेवावी. गोदामात कीड राहणार नाही याची काळजी घ्यावी.

५. ज्या साठ्यात केंद्र सरकारने नेमून दिलेल्या परिमाणांपेक्षा जास्त पिवळे, डॅमेज दाणे, तुकडा जास्त असेल तर असा खराब साठा वेगळा ठेवावा. त्याचा उठाव लिलावामार्फत करावा.

साठ्याची गुणवत्ता राखण्यासाठी वेळेवर जावक ः

१. गोदामात आवक झालेला साठा त्याच्या गुणवत्तेप्रमाणे व त्याच्या साठवणुकीच्या क्षमतेप्रमाणे वेळेवर जावक देणे गरजेचे असते.

२. गुणवत्ता चांगली असेल तर साठा साठवणुकीसाठी ठेवता येतो.

३. एखाद्या साठ्याला कीड लागली तर त्याची जावक घ्यावी.

४. कुठल्याही साठ्याला कीड लागली असले तर तो धुरीकरण करूनच जावक द्यावा.

साठ्याच्या मुदतीत वाढ ः

१. एखादा ठेवीदार त्याने नमूद केलेल्या मुदतीपेक्षा जास्त वेळ साठा ठेवत असेल तर तसे पत्र देणे आवश्यक.

२. ठेवीदाराने वखार केंद्रावर साठा आणल्यास केंद्रप्रमुख त्या साठ्याचा नमुना तपासून तो साठवणुकीस योग्य आहे की नाही, हे सांगतील.

३. केंद्रप्रमुख साठ्याच्या गुणवत्तेबद्दल नमुना तपासतील. त्यात कीड आहे की नाही हे तपासतील.

४. वखार केंद्रावर आलेल्या साठ्याचा नमुना केंद्रप्रमुख ३ ते ६ महिने सांभाळतील.

५. वखार केंद्रावरील साठा केंद्रप्रमुखाने तपासल्यावर त्याची किंमत ठरवावी. त्याप्रमाणे त्याचा विमा उतरवावा.

वखार केंद्रावरील साठ्याची जावक देण्याची पद्धत, कागदपत्रांची पूर्तता ः

१. वखार केंद्रावरील साठ्याची जावक देण्यापूर्वी केंद्रप्रमुख वखार पावती व साठा घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीची कागदपत्रे तपासतील.

२. वखार केंद्रावर वखार पावती आणि साठा उचलण्यास आलेल्या प्रतिनिधींची योग्यता तपासण्यासाठी यंत्रणा ठेवावी.

३. केंद्रप्रमुखाने कुठल्याही परिस्थितीत वखार पावती असल्याशिवाय जावक देऊ नये.

४. इलेक्ट्रॉनिक हस्तांतरीय वखार पावतीवर जर बँकेचे कर्ज असेल, तर बँकेकडून साठ्याची जावक देण्यासाठी परवानगी मिळवावी.

५. वखार केंद्रावर आलेल्या साठ्याचे वजन केले नसेल तर ठेवीदार किंवा त्यांच्या प्रतिनिधीला ज्या ठिकाणी साठा ठेवला होता ती जागा दाखवावी.

६. वखार केंद्रावर साठ्याची जावक देताना त्याची प्रत व वजन तपासण्याची सोय असावी.

संपर्क ः प्रशांत चासकर, ९९७०३६४१३० (शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी, स्मार्ट महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com