Animal Husbandry : थंडीपासून संरक्षणासाठी व्यवस्थापनात बदल

Winter Livestock Care : नाशिक जिल्ह्यातील तरसाळी (ता. सटाणा) येथील पाटील कुटुंबीय २०१६ पासून गोसंगोपन करत आहे. अवघ्या १० गीर गाईंपासून व्यावसायिक पद्धतीने सुरू केलेले गोसंगोपन आज २०० गोवंशापर्यंत विस्तारले आहे.
Animal Husbandry
Animal HusbandryAgrowon
Published on
Updated on
Summary

Cold Protection Management :

शेतकरी नियोजन

गोपालन

शेतकरी : सुधाकर धर्मा पाटील

गाव : तरसाळी, ता. सटाणा, जि. नाशिक

एकूण गाई : २०० (लहान-मोठ्या मिळून)

एकूण शेड : ३

नाशिक जिल्ह्यातील तरसाळी (ता. सटाणा) येथील पाटील कुटुंबीय २०१६ पासून गोसंगोपन करत आहे. अवघ्या १० गीर गाईंपासून व्यावसायिक पद्धतीने सुरू केलेले गोसंगोपन आज २०० गोवंशापर्यंत विस्तारले आहे.

दूध विक्रीसह दूध व गोमूत्रापासून ११ प्रक्रियायुक्त उत्पादने तयार केली जातात. उत्पादनांच्या विक्रीसाठी विक्री व्यवस्था उभारली आहे.  त्या माध्यमातून आई सारजाबाई यांच्या नावाने  ‘सारजा डेअरी फार्म’ गीर गोसंवर्धन केंद्र नावारूपास आणले आहे.

तणावमुक्त ‘आनंदी देशी गोवंश’  संगोपनाची संकल्पना गोठ्यात साकारली आहे. अर्थकारण उंचाविण्यासाठी व्यवसायाची  आदर्श  पंचसूत्री तयार करून व्यवसाय किफायतशीर केला आहे. दूध उत्पादन व विक्री तसेच दूध व गोमूत्रापासून विविध प्रक्रियायुक्त उत्पादने, गोबरगॅसच्या माध्यमातून ऊर्जानिर्मिती, शेतीसाठी शेणस्लरी व रोगमुक्त गीर गोवंश संवर्धन व पैदास हे त्यात प्रामुख्याने आहे.

Animal Husbandry
Animal Husbandry : महाराष्ट्रातील उद्यमशील पशुपालक

चारा व खाद्य व्यवस्थापन

गाईंच्या शरीरातील तापमान टिकून ठेवण्यासाठी त्यांना संतुलित आहार व्यवस्थापनावर भर दिला जातो.

ढेप, मक्याचा भरड, राइस पॉलिश व गोळी पेंड दिली जाते.

जनावरांच्या सुदृढ आरोग्यासाठी मीठ व खनिज द्रव्यांचा आहारात नियमित वापर केला जातो.

गायींची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासह पौष्टिक व गुणवत्तापूर्ण दुधासाठी आहारात शतावरी, अश्वगंधा, गुळवेल यांचा वापर केला जातो.

शेवग्याच्या पाल्याचा देखील वापर खाद्यामध्ये केला जातो. याशिवाय महिन्यातून एकदा कडुनिंबाचा पाला आहारात दिला जातो. काही प्रमाणात गरजेनुसार होमिओपॅथिक औषधांची मात्रा दिली जाते.

गाईंना २४ तास स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करण्यात आली आहे. हिवाळ्याच्या दिवसांत गाई पाणी कमी पितात. मात्र आहारात मिठाचा समावेश असल्यास त्यांची पाणी पिण्याची क्षमता वाढते. शरीरात पाणी गेले तर त्याचा दूध वाढीसाठी फायदा होत असतो.

दररोज सरासरी २०० ते २५० लिटर दूध उत्पादन मिळते. त्यापैकी ८० लिटर दुधाची विक्री होते. तर घरगुती वैदिक बिलोणा पद्धतीने अखंडपणे देशी गाईच्या दुधापासून सरासरी ५ ते ६ लिटर तूप निर्मिती केली जाते. वासरांना थेट गाईचे दूध पिऊ दिले जाते. वासरू दूध पिऊन पूर्णपणे संतुष्ट झाल्यानंतर दूध काढणी केली जाते.

चारा पिकांची लागवड

गाईंना दर्जेदार चारा उपलब्ध होण्यासाठी ५ एकर क्षेत्रावर चारा पिकांची लागवड केली आहे. त्यात सुपर नेपिअर, दशरथ घास  या  चारा पिकांची लागवड केली आहे. दररोज  प्रति गाय १५ ते १६ किलो हिरवा चारा व कोरडा चारा ५ ते ६ किलो प्रमाणे दिला जातो.  कोरड्या  चाऱ्यामध्ये गहू, ज्वारी, सोयाबीन मका कुटार  असतो. याशिवाय मुरघास निर्मिती केली जाते.

Animal Husbandry
Animal Husbandry : प्रतिजैविकांच्या अतिवापराचा जनावरांवर परिणाम

व्यवसाय दृष्टिक्षेपात

१७० बाय ३५ फूट आकाराच्या  मुक्तसंचार  गोठ्याची उभारणी.

लहान मोठ्या मिळून गोठ्यात एकूण २०० गायींचे संगोपन.

गोठ्यात मोठ्या ९० गीर गाईंचे संगोपन.

पोषक घटकांनी युक्त आहार देण्यासाठी योग्य नियोजन.

उच्च गुणसूत्र व अधिक दूध उत्पादन देणारे देशी गोवंश निर्मितीसाठी शास्त्रीय पैदास कार्यक्रमाची अंमलबजावणी.

दिवसभर गोठ्यात गाईंसाठी सुमधुर बासरी वादनाचे संगीत.

आजार टाळण्यासाठी स्वच्छतेची काटेकोर अंमलबजावणी. जैवसुरक्षा नियमांचे पालन.

पहाटे ३ ते सकाळी ९ आणि दुपारी ३ ते ८ असे दोन सत्रात कामांचे विभाजन. त्यात स्वच्छता, चारापाणी, दूध संकलन अशी कामे.

प्रत्येक गाईला विशिष्ट नामकरण तसेच टॅगिंग.

स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी टाक्यांमध्ये चुन्याचा वापर.

दुभत्या गाई, भाकड गाई, गाभण गाई व वासरांसाठी स्वतंत्र  कक्ष.

ऋतुनिहाय व्यवस्थापन पद्धतीत बदल.

दैनंदिन दूध उत्पादन, प्रक्रिया उत्पादन व विक्रीच्या नोंदी, मागणीनुसार पुरवठा  .

शास्त्रीय पद्धतीने पैदास कार्यक्रम

नैसर्गिक रेतन पद्धतीसह  ‘सेक्स सॉर्टेड सीमेन’  व  ‘आयव्हीएफ’ तंत्रज्ञानाचा वापर करून देशी गोवंश पैदास कार्यक्रम राबविला जातो. दरवर्षी गोठ्यात नवीन ७० वासरांना जन्म दिला जातो. गीर गोवंशाचे गुणधर्म, उच्च गुणसूत्र असलेल्या निरोगी गीर गोवंशाची निवड करून संगोपन केले जाते. उच्च गुणसूत्र व अधिक दूध उत्पादन देणारे देशी गोवंश निर्मिती या उद्देशाने शास्त्रीय पद्धतीने पैदास कार्यक्रम गोठ्यात राबविला जात आहे. सध्या ४५ गाई ‘सेक्स सॉर्टेड सिमेन्स’ने गाभण आहेत.

हिवाळ्यातील व्यवस्थापन

हिवाळा ऋतू जनावरांसाठी अत्यंत आल्हाददायक पोषक असतो. मात्र कमी होणाऱ्या तापमानात गाई व वासरांचे थंडीपासून बचाव करणे महत्त्वाचे असते. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात गायींचे दूध उत्पादन कमी होत असते. त्यासाठी योग्य व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे.

हिवाळा सुरू होण्यापूर्वी गाईंच्या पोटातील जंत निर्मूलनासाठी जंतनाशकाची मात्रा दिली जाते. वाढत्या थंडीचा जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे तापमान नियंत्रित करण्यासाठी व प्रामुख्याने जनावरांच्या शरीरात ऊर्जा पातळी टिकून ठेवण्यासाठी संतुलित व पोषक खाद्य दिले जाते. त्यामध्ये हिरव्या चाऱ्याचे दोन तृतीयांश, तर कोरड्या चाऱ्याचे प्रमाण एक तृतीयांश इतके असते.

थंडीच्या काळात पहाटे, सकाळी व रात्री थंड वारे वाहतात. थंड वाऱ्यांपासून गाईंचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या भोवती बारदाने लावली जातात. जेणेकरून पश्चिमेकडून येणारे थंड वारे थेट गोठ्यात येणार नाहीत.

थंडीचे दिवसात वासरांचे संगोपनही तितकेच महत्त्वाचे असते. त्यांच्यासाठी गोठ्यातील खाली बसण्याच्या जागा कोरडी ठेवली जाते. तसेच बारदान अंथरले जाते.

- अनिरुद्ध पाटील ९९२१२४२९९५

(शब्दांकन ः मुकुंद पिंगळे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com