Swapnil Shinde
गेल्या काही दिवसापासून अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सर्वात मोठा फटाका कांद्याला बसला आहे.
विक्रीयोग्य कांदा शेतातच पाण्यात सडायला लागल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
अवकाळी पावसाच्या तडाख्याने नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याची लागवड संकटात आली असून लाल कांदा ही खराब होणार आहे.
कांद्याची पात तुटून पडल्याने कांदा उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे
काही ठिकाणी बुरशी लागणे सुरु होऊन कांदा खराब होण्यास सुरुवात झाली आहे
पावसाच्या उघडपीनंतर दोन दिवसात किटकनाशकांची फवारणी करणे गरजेचे आहे.
कांद्यावर करपा आणि बुरशीचा प्रादुर्भाव असेल तर किडनाशक आणि बुरशीनाशक हे एकत्रित फवारणी करावे.