
Amravati News: जिल्ह्यात मक्याच्या क्षेत्रात २१० टक्के वाढ झाली आहे. आदिवासी क्षेत्रासह गैरआदिवासी क्षेत्रातील वाढ उल्लेखनीय ठरली आहे. मका उत्पादनातून मिळणारा लाभ पटवून देण्यात कृषी विभागास यश आल्याने ही क्षेत्रवाढ झाली आहे. जिल्ह्यात तब्बल ४३ हजार १०९ हेक्टर क्षेत्रात मका लागवड झाली.
खरीप हंगामात कापूस, सोयाबीन व तूर ही मुख्य पिके या जिल्ह्यात घेतली जातात. यासोबतच ज्वारी, मूग, उडीद, भुईमूग ही पिके घेतली जातात. ज्वारी व मक्याचे पीक प्रामुख्याने आदिवासीबहूल धारणी व चिखलदरा तालुक्यात घेतले जाते. यंदा गैरआदिवासी भागातही मक्याची पेरणी वाढली असून एकूण ३ हजार ६२० हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे.
तर धारणी व चिखलदरा, या दोनच तालुक्यात ४० हजार ७२० हेक्टरवर पेरणी झाली आहे. मक्याचे पीक आदिवासी भागातच अधिक प्रमाणात दरवर्षी घेतले जाते. धारणी तालुक्यात २७ हजार १६० व चिखलदरा तालुक्यात १३ हजार ५६० हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. या भागातील आदिवासी मक्याचा वापर आहारात अधिक करीत असून, जनावरांच्या चाऱ्यासाठी करतात.
याशिवाय बाजारात विकून मिळणाऱ्या मिळकतीमुळे आदिवासी शेतकरी या पिकास प्राधान्य देत आहेत. यंदा गैरआदिवासी क्षेत्रातही मक्याची पेरणी वाढली आहे. ३ हजार ६२० हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे.
जिल्ह्यात २१० टक्के वाढ
अमरावती जिल्ह्यात मक्यासाठी सरासरी २० हजार ६९९ हेक्टर क्षेत्र आहे. या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात ४३ हजार १०९ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. दरवर्षी होणाऱ्या पेरणीक्षेत्रात यंदा २१० टक्के वाढ झाली आहे. कृषी विभागाच्या जनजागृतीचे हे यश मानल्या जात आहे.
तालुकानिहाय मका पेरणी
धारणी ः २७,१६०, चिखलदरा ः १३,५६०, अमरावती ः ४५, चांदूररेल्वे ः २१, मोर्शी ः ३१९, वरुड ः १,२२०, अचलपूर ः ६२५ चांदूरबाजार ः १५९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.