Kondhane Dam Scam : कोंढाणे धरणात महायुतीचा १ हजार ४०० कोटींचा घोटाळा, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

Vijay Vadettiwar : महायुती सरकारने कोंढाणे धरण प्रकल्पात १ हजार ४०० कोटींचा महाघोटाळा केला अशल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
Kondhane Dam Scam
Kondhane Dam Scamagrowon
Published on
Updated on

CIDCO's Kondhane Dam : सिडकोच्या पाणी पुरवठा योजनेत मेघा इंजिनिअरिंगवर मेहेरबान असलेल्या महायुती सरकारने कोंढाणे धरण प्रकल्पात १ हजार ४०० कोटींचा महाघोटाळा केला असल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. सरकारने या सिडकोच्या पाणीपुरवठा योजनेतील कोंढाणे धरण प्रकल्पातील १ हजार ४०० कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी मंगळवार (ता.०१) केली.

मुंबई येथील प्रचितगड या शासकीय निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत वडेट्टीवार बोलत होते. आमचं सरकार आल्यावर महायुतीच्या काळातील घोटाळ्यांची आम्ही चौकशी करू असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

वडेट्टीवार म्हणाले की, "महायुती सरकार मेघा इंजिनिअरिंगवर कंत्राटांची खैरात करत आहे. लाडक्या कंत्राटदारांचे खिसे भरून निवडणूक फंड गोळा करण्यात व्यस्त असल्याने शेतकऱ्याकडे पहायला सरकारला वेळ नाही. म्हणून सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीनला दर मिळण्यासाठी मंत्र्यालयासमोर टाहो फोडत आहे. अदानीला खूश करण्यासाठी पाम तेल आयत केल्याने सोयाबीनचे दर पडले आहेत. सरकारसाठी अदानी, मेघा इंजिनिअरिंग लाडके कंत्राटदार आहेत. पण हे सरकार शेतकऱ्याला लाडका कधी म्हणणार असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला".

"नवी मुंबईतील सिडको तर्फे पाणी पुरवठा करण्यासाठी कोंढाणे धरण हस्तांतरीत करण्यात आले. यासाठी सिडकोने १ हजार ४०० कोटींचे टेंडर काढले. यापूर्वी या धरणाबाबत मुंबई हाय कोर्टात अंजली दमानिया यांनी याचिका दाखल केली होती. यावेळी मूळ कंत्राटदार काम करण्यास तयार असेल तर त्याला काम करण्यास सांगितले होते. झालेल्या ३५ टक्के कामासाठी मूळ कंत्राटदाराला १०० कोटी रुपये देण्यात आले. मात्र अचानक सिडको साक्षात्कार झाला आणि इथे माती ऐवजी सिमेंट काँक्रीटचे धरण झाले पाहिजे अशी सरकारने भूमिका घेतली. पुन्हा ३ सप्टेंबर २०२३ रोजी टेंडर काढल्याचे त्यांनी सांगितले".

Kondhane Dam Scam
Vijay Wadettiwar On Chandrashekhar Bawankule : विरोध असतानाही बावनकुळे यांच्या संस्थेला भूखंड; वडेट्टीवार यांची टीका

अचानक आरसीसी  काम करण्याचा निर्णय

यामध्ये ७०० कोटींचे काम वाढवून १ हजार ४०० कोटी वर नेण्यात आले. पण मुळात प्रश्न असा आहे की आरसीसी काम करण्याचा निर्णय का घेतला गेला. मेघा इंजिनियरिंग या कंपनीला समोर ठेवूनच हा निर्णय घेण्यात आला आहे हे स्पष्ट आहे. मोरबे धरणातून २० वर्ष झाली दररोज नवी मुंबईला पाणी पुरवठा होतो. मग हे धरण आरसीसी करण्याचे कारण काय? लाडक्या कंत्राटदार साठी कोंडाणे धरणाचे स्वरूप का बदलले. याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे असा सवाल विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी उपस्थित केला".

महायुती सरकार घोटाळे करताना थकत नाही. महाराष्ट्र लूटून खाण्याचे काम सुरू आहे. या सरकारचे कितीही घोटाळे जनतेसमोर मांडले तरी देखील सरकारला काहीच फरक पडत नाही. कारण महायुती सरकार गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. या सरकारला हाकलल्याशिवाय महाराष्ट्राचे भलं होणार नाही अशा शब्दात वडेट्टीवार यांनी टीका केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com