Mahavitaran Agricultural Pump : महावितरणचा सावळा गोंधळ, कृषी पंपाच्या बिलात तब्बल ७६ हजार रुपये लावले जादा

Meter Reading Agricultural Pump : कोरोनाकाळात कृषी पंपाचे मिटर रिडींग न झाल्याने कित्येक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे.
Mahavitaran Agricultural Pump
Mahavitaran Agricultural Pumpagrowon
Published on
Updated on

Agricultural Pump : कोरोनाकाळात कृषी पंपाचे मिटर रिडींग न झाल्याने कित्येक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. महावितरण कृषी पंपाचे कोरोनाचे कारण सांगून मीटर रीडिंग न देताच भरमसाठ बिल लावल्याचा प्रकार कोल्हापूर जिल्हयातील राधानगरी तालुक्यात समोर आला आहे. दरम्यान महावितरण ग्राहकांकडून अत्यंत वाईट पद्धतीने बिल वसुली करत असल्याचे समोर आल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोळांकूर (ता. राधानगरी) येथील मिलिंद विनायक कुलकर्णी यांनी कृषी पंपाच्या वाढलेल्या बिलाबाबत तक्रार केली होती. त्यांच्यावतीने ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते संजय हुक्केरी यांनी जोरदार बाजू मांडल्याने महावितरणने चुकीच्या पद्धतीने मिटर रीडिंग घेतल्याचा सावळा गोंधळ समोर आला आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

https://whatsapp.com/channel/0029Va6bBAMI1rckFSh9s61r

दरम्यान कुलकर्णी यांना ५७ हजार ९५५ युनिटचे ९४ हजार १५९ एवढे बिल रद्द करून ग्राहकास ११ हजार ५९१ युनिटचे १८८३१ रुपये बिल नव्याने द्यावे असा आदेश महावितरणच्याच ग्राहक तक्रार निवारण मंचने दिला आहे. त्यामुळे ग्राहकाचे बिलापोटी जाणारे तब्बल ७५ हजार ३२८ रुपये वाचल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

मंचचे स्वतंत्र सदस्य श्रीकांत बावीसकर आणि सुधाकर जाधव यांनी १३ ऑक्टोबरला हा निकाल दिला. महावितरण कंपनीने २४ मार्च २०२३ चा मीटर तपासणी अहवाल व १६ नोव्हेंबर २०२२ चा स्थळ परीक्षण अहवाल सादर केला होता. १० एचपीचा हा पंप असल्याची माहिती समोर आहे.

Mahavitaran Agricultural Pump
Sugarcane Farmer Kolhapur : कोल्हापूरचा शेतकरी ग्रेटच! तब्बल वीस अंतरपिके घेत ऊसशेतीही केली फायदेशीर

महावितरण कंपनीनेच सादर केलेल्या तक्त्यावरून सप्टेंबर २०१८ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत सरासरी तिमाही वापर २९५ युनिट्स होता. तर डिसेंबर २०१९ ते मार्च २०२२ (३० महिने) या कालावधीत सरासरी तिमाही वापर ५७९५ युनिट्स व जून २०२२ ते जून २०२३ या कालावधीतील सरासरी तिमाही वापर ८४५ युनिट्स केल्याची माहिती समोर आली आहे. असे असताना तक्रार कालावधीत तिमाही वीज वापर ५७९५ युनिट्स का आहे याचा खुलासा महावितरण करू शकले नाही.

मीटर सुस्थितीत असतानाही ग्राहकाला अंदाजित बिले दिल्याचे निरीक्षण मंचाने नोंदवले आहे. ११ हजार ५९१ युनिट्सचे सुधारित देयक द्यावे. ग्राहकावर लादलेले जादा बिल महावितरण कंपनीने संबंधित ठेकेदार व कर्मचाऱ्यांकडून वसूल करावे असेही आदेशात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com