Electricity Helpline : विजेच्या तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक

Mahavitaran : वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांना आता १९१२, १८००२३३३४३५ व १८००२१२३४३५ या तिन्ही टोल फ्री क्रमांकावर तक्रारी नोंदवता येणार आहेत.
Electricity
ElectricityAgrowon
Published on
Updated on

Solapur News : वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांना आता १९१२, १८००२३३३४३५ व १८००२१२३४३५ या तिन्ही टोल फ्री क्रमांकावर तक्रारी नोंदवता येणार आहेत. बिलासंदर्भातील तक्रारीदेखील त्यावर नोंदविण्याची सोय असेल, असे ‘महावितरण’ने आवाहन केले आहे. ही सेवा २४ तास कार्यरत असणार आहे.

सर्व ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी तसेच त्यांनी वापरलेल्या विजेचे अचूक देयक तयार करण्यासाठी महावितरण कायम प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करते. ग्राहकांच्या मीटरपर्यंत येणारी वीज हजारो किलोमीटरच्या जाळ्यातून येते.

Electricity
Jalna Electricity Theft : महावितरणची वीज चोरीप्रकरणी धडक कारवाई

यामध्ये अनेक रस्ते अपघात, नैसर्गिक व मानवनिर्मित अडथळे येतात. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार महावितरणला वेळेत व नेमक्या ठिकाणांसह मिळाली तर ती वेळेत निकाली काढून तेथील ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करणे शक्य होते.

मात्र, सद्य:स्थितीत ग्राहक ऑनलाइनपेक्षा वैयक्तिक तक्रारींवर जादा भर देत असल्याने यंत्रणेचा वेळ खर्ची जात आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने ग्राहकांसाठी नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ते टोल फ्री क्रमांक महावितरणच्या संकेतस्थळावर व वीजबिलांवरही देण्यात आले आहेत.

Electricity
Electricity Tariff Reduction: चार पूरक व्यवसायांना कमी दरात वीज मिळणार

तक्रार नोंदविताना ग्राहकांनी त्यांचा १२ अंकी ग्राहक क्रमांक नोंदवावा. त्यामुळे बिघाड शोधण्यासाठी वेळ वाया जात नाही. त्यांची तक्रार थेट संबंधित शाखा कार्यालयाला वर्ग होते. दरम्यान, वीज ग्राहकांनी फोनवर अधिकारी, कर्मचाऱ्यांना तक्रारी करणे टाळावे, जेणेकरून त्यांनाही काम करताना धोका होणार नाही.

एसएमएस अन्‌ मिस कॉलद्वारेही तक्रार

वीजग्राहकांनी महावितरणकडे नोंदविलेल्या क्रमांकावरून ०२२-५०८९७१००या क्रमांकावर मिस कॉल द्यावा किंवा नोंदणीकृत मोबाईलवरून “NOPOWER<ग्राहक क्रमांक>” हा संदेश टाइप करून ९९३०३९९३०३ या क्रमांकावर पाठविल्यास वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंद होते. तसा संदेश ग्राहकाला जातो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com