
Mumbai News : सांगली, मुंबईत उत्तरसह अन्य जागांचा तिढा सोडवत महाविकास आघाडीने राज्यातील सर्व जागावाटप जाहीर करत महायुतीपेक्षा एक पाऊल पुढे टाकले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवसेनेच्या शिवालय या कार्यालयात झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जागावाटप जाहीर करण्यात आले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला २१, काँग्रेसला १७ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला १० जागा देण्यात आल्या.
२१-१७-१० असा फॉर्म्यूला शिवसेना (उद्धव ठाकरे गट) : जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशीव, रत्नागिरी, बुलडाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतामाळ-वाशीम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण , मुंबई उत्तर पूर्व : (२१)
काँग्रेस : नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक : (१७)
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) : बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर, बीड : (१०)
शक्य असून अदलाबदल नाही
सांगलीच्या जागेवर माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांची दावेदारी होती. पाटील हे भाजपच्या संजयकाका पाटील यांच्याविरोधातील प्रबळ उमेदवारी मानले जात होते. मात्र जागावाटपात पहिल्याच टप्प्यात शिवसेनेला ही जागा सोडल्याने तेथे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करून प्रचाराला सुरुवात केली.
तर उत्तर मुंबईत विनोद घोसाळकर हे प्रमुख दावेदार होते. मात्र ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली. येथे काँग्रेसकडून लक्षवेधी चेहरा अद्याप समोर आलेला नाही. या दोन्ही जागांची अदलाबदल शक्य होती मात्र, दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या भांडणात ती होऊ शकली नाही, असेही बोलले जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.