Loksabha
LoksabhaAgrowon

LokSabha Constituency : ‘भाजपचे १८ लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष’

BJP Focus on Loksabha : भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील १८ मतदार संघांमध्ये भाजप- महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचे ध्येय ठेवले आहे.

Nagar News : भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील १८ मतदार संघांमध्ये भाजप- महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचे ध्येय ठेवले आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. हे मतदार संघ जिंकण्याच्या दृष्टीनेच विशेष लक्ष दिले जाणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश सचिव तथा बारामती लोकसभा प्रभारी नवनाथ पडळकर यांनी दिली.

नवनाथ पडळकर हे बुधवारी (ता. २०) नगर शहरातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यासाठी आले होते. त्या वेळी शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सचिन पारखी, प्रशांत मुथा, महेश नामदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Loksabha
Nagar Loksabha : ‘राष्ट्रवादी’च्या पवार गटाकडून नगर जिल्ह्यावर लक्ष केंद्रित

पडळकर म्हणाले, की भाजपची लोकसभा निवडणुकीची पक्षीय पातळीवर तयारी सुरू आहे. राज्यातील १८ लोकसभा मतदार संघांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. सध्या हे मतदार संघ महाआघाडीच्या ताब्‍यात आहेत. यामध्ये बारामती लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. बारामती मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. दोन आमदार भाजप, दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि दोन काँग्रेसचे आमदार आहेत.

Loksabha
Loksabha Election : आगामी महासंग्रामाची पटकथा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट भाजपबरोबर आला आहे. त्यामुळे भाजपची ताकद या ठिकाणी वाढली आहे. पक्षाच्या २५ डिसेंबरपर्यंत सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. विकसित भारत संकल्प यात्रा ही येत्या २६ जानेवारीपर्यंत राबविली जाणार आहे. शहरी विकासाच्या योजनांच्या प्रचार आणि प्रसारासाठी ही अभियान राबविले जाणार आहे.

महाजनादेश २०२४ यात्रा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश २०२४ यात्रा लवकरच सुरू केली जाणार आहे. प्रत्येक लोकसभा मतदार संघामध्ये एक जाहीर सभा होणार आहे. विश्‍वकर्मा योजनेअंतर्गत गाव पातळीवरील बारा बलुतेदारांसाठी १३ हजार कोटींचे कर्ज व्यवसायासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. उज्ज्वला योजनेचा १० लाख कुटुंबांना लाभ मिळाला आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी ७५ लाख कुटुंबांना लाभ दिला जाणार आहे, असे नवनाथ पडळकर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com