Market Committee Result : वाशीममध्ये महाविकास आघाडीचा बोलबाला, रिसोडमध्ये भाजपची सत्ता

वाशीम जिल्ह्यात रविवारी (ता. ३०) झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला.
Mahavikas aghadi
Mahavikas aghadiAgrowon

Washim Apmc Election Update : वाशीम जिल्ह्यात रविवारी (ता. ३०) झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला.

रिसोडमध्येच केवळ भाजप व सहकारी पक्षाच्या सहकार विकास आघाडीला विजय मिळवता आला. सहकार क्षेत्रावर काँग्रेस, राष्ट्र्वादी काँग्रेसचे वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले.

डहाके गटाचे वर्चस्व कायम

कारंजा लाड बाजार समितीवर (कै.) माजी आमदार प्रकाश डहाके प्रणित शेतकरी विकास आघाडीचा झेंडा फडकला. संचालक पदाच्या १८ जागांवर एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित करून सहकार क्षेत्राचे आपणच ‘दादा’ असल्याचे दाखवून दिले.

निकालानंतर डहाके यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित संचालकांचा सईताई डहाके व दत्तराज डहाके, देवव्रत डहाके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

निकालामध्ये सेवा सहकार संस्था सर्व साधारण संघामधून सईताई प्रकाश डहाके, नितीन नेमाने, बाबूराव चौधरी, विजय हिवाळे, वीरेंद्र चारथला, प्रविण वानखडे, देवेंद्र राऊत तसेच महिला संघामधून सुनंदाबाई गुंजाटे, कावेरी मते, अरुण वानखडे, दिनेश राठोड, साहेबराव तुमसरे, मधुकर घुले, बालचंद् जाधव, प्रकाश लिंगाटे, तसेच व्यापारी व अडतेमधून ब्रिजमोहन मालपाणी, अनिल पाकधणे विजयी झाले. डहाके गटाचे १८ उमेदवार विजयी झाले.

Mahavikas aghadi
Parbhani APMC Election : ‘महाविकास’चा दबदबा कायम, भाजपच्या मनसुब्यावर पाणी

रिसोडमध्ये भाजप-मित्र पक्षांचा झेंडा

रिसोड बाजार समितीच्या १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप व मित्र पक्षाच्या सहकार विकास आघाडीने १० जागांवर विजय मिळवत माजी खा. अनंतराव देशमुख यांच्या नेतृत्वाने आपले स्थान बळकट असल्याचे दाखवून दिले. महाविकास आघाडीला येथे आठ जागांवर समाधान मानावे लागले. या बाजार समितीची निवडणूक अत्यंत अटीतटीची राहिली.

रात्री दोन वाजेपर्यंत मतमोजणी होऊन निकाल आले. मतमोजणीदरम्यान महाविकास आघाडीने लागोपाठ सात जागा काबीज केल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अंतिम निकालात १० विरुद्ध ८ असे जागांचे समीकरण तयार झाले. गेल्या अनेक वर्षांपासून माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या गटाने कृषी उत्पन्न बाजार समितीवर एकतर्फी वर्चस्व गाजवले आहे.

श्री. देशमुख यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली ही पहिलीच निवडणूक होती. या वेळी त्यांच्यासोबत भाजपचे माजी आमदार विजयराव जाधव, शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी होत्या. काँग्रेस आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने कडवी झुंज दिली. वाशीम जिल्ह्यात भाजपला केवळ रिसोडमध्ये यश मिळाले असून या ठिकाणी त्यांनी १० जागा जिंकल्या.

विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाके वाजवून आणि गुलाल उधळत विजयाचा आनंद साजरा केला. या निवडणुकीत गजानन प्रकाश अवताडे, श्‍यामराव उगले, श्‍याम खराटे, राजेंद्र देशमुख, गजानन पाचारणे, सयाजी शिंदे, धनजंय बोरकर, चंद्रभागा गरड, इंदुबाई तेजराव वानखेडे, विष्णूपंत भुतेकर, भगवान गाडे, रवींद्र चोपडे, संतोष सानप, भीमा शेजूळ, राजाराम आरू, रमेश गायकवाड, पुरुषोत्तम तोष्णीवाल, रामचंद्र बुधनेर यांनी विजय मिळवला.

मालेगावमध्ये महाविकास आघाडी सत्तेत

मालेगाव बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने पुन्हा सत्ता मिळवली. १८ पैकी विकास आघाडीचे १७ संचालक निवडून आले आहेत. भाजपला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला.

तालुक्यातील सहकार क्षेत्रावर आजपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहलेले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी महाविकासतर्फे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे-वंचित बहुजन आघाडी, बळीराजा मित्र मंडळ व डॉक्टर अरुण इंगोले मित्र मंडळ एक संघपणे या प्रचाराला लागले होते. त्यांनी विजय खेचून आणला.

Mahavikas aghadi
Jalgaon APMC Election : जळगावात पालकमंत्र्यांना धक्का, धुळ्यात भामरेंचा भ्रमनिरास

मानोऱ्यात महाविकास आघाडीची एकहाती सत्ता

मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास पॅनेलने एक हाती सत्ता काबीज करीत १५ संचालक निवडून आणले. भाजप समर्थक शेतकरी आघाडीला दोन तर एका अपक्ष उमेदवाराने विजय संपादन केला.

महाविकास आघाडीकडून व्यापारी अडते मतदार संघातून विजय राठी, अरुण हेडा, सेवा सहकारी मागास प्रवर्ग मतदार संघातून अभिजित पाटील, सेवा सहकारी संस्था विमुक्त जाती जमाती मतदार संघातून माणिक पवार, सेवा सहकारी संस्था महिला राखीव मतदार संघातून सीमा संजय पवार, सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदार संघातून सचिन रोकडे, डॉ. संजय रोठे, विलास पाटील, भुजंगराव राठोड, पुष्पाबाई इंगळे, अरविंद राऊत, ग्राम पंचायत सर्वसाधारण मतदार संघातून आशिष पाटील, दिनेश राठोड, ग्राम पंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघातून सुनील जामदार, ग्राम पंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून सुनिता मानकर विजयी झाले आहेत.

भाजप समर्थक शेतकरी आघाडीकडून सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदार संघातून नीलेश ठाकरे व सेवा सहकारी महिला राखीव मतदार संघातून इंदुबाई इंगोले विजयी झाल्या. हमाल मापारी मतदार संघातून अपक्ष अनिस शेख विजयी झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com