Sericulture : महारेशीम अभियान सुरू

Mahareshim Abhiyan : रेशीम विभागाला ८०३५ एकर, कृषी विभागाला ८९०० एकर व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला ८०६५ एकरांवर तुती लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे.
Silk Farming
Silk FarmingAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : रेशीम शेतीचे महत्त्व व त्यातून मिळणाऱ्या हमखास व शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी, या साठी आगामी वर्षात तुती लागवड करण्यासाठी इच्छुकांची नाव नोंदणी करण्यासाठी सोमवारपासून (ता. २०) महारेशीम अभियान राबविणे सुरू झाले आहे. २० डिसेंबरपर्यंत हे अभियान राबविण्यात येईल. त्याद्वारे २५ हजार एकरांवर तुती विस्ताराचे उद्दिष्ट रेशीम, कृषी व जिल्हा परिषद कृषी विभागाला विभागून देण्यात आले आहे.

रेशीम विभागाला ८०३५ एकर, कृषी विभागाला ८९०० एकर व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला ८०६५ एकरांवर तुती लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. त्या तुलनेत दुप्पट लागवड रेशीम विभागाच्या संचालकांनी अपेक्षित धरली आहे. रोजगाराची मोठी क्षमता असलेल्या रेशीम उद्योगास राज्यातील हवामान पोषक आहे.

Silk Farming
Sericulture Farming : सांगलीच्या शेतकऱ्याची ऊस पट्ट्यात रेशीम शेतीचा यशस्वी उद्योग

यातून हमखास व नियमित उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कलही वाढत चालला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुती लागवडीसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी बी. डी. डेंगळे यांनी केले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तुती लागवडीव्दारे रेशीम कोष उत्पादन योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे, महिला प्रधान कुटुंबे, शारीरिक अपंगत्व प्रधान कुटुंबे, भुसुधार योजनेचे लाभार्थी, कृषी कर्ज माफी योजनेनुसार अल्प भूधारक सीमांत शेतकऱ्यांची प्राधान्याने निवड करण्यात येईल.

Silk Farming
Sericulture : नांदेडमध्ये रेशीम शेतीसाठी एक हजार एकराचे उद्दिष्ट

योजनेअंतर्गत एक एकर रेशीमसाठी तीन वर्षांत लागवड व जोपासनेसाठी ६८२ मनुष्य दिवस व कीटक संगोपनगृह बांधकामासाठी २१३ मनुष्य दिवस असे एकूण ८९५ मनुष्य दिवसांची मजुरी अकुशल घटकांतर्गत लाभार्थ्याला मस्टरद्वारे अदा केली जाते. त्याबरोबरच कीटक संगोपन साहित्य व कीटक संगोपनगृह बांधकाम साहित्य खरेदीसाठी कुशल घटकांतर्गत रक्कमही अदा करण्यात येते.

विभागनिहाय उद्दिष्ट (एकरांत)

विभाग...रेशीम...कृषी...जि.प.कृषी

अमरावती...१२५०...१३००...१२५०

नागपूर...१०२५...१०००...१०२५

छत्रपती संभाजीनगर...३३५०...३६००...३३००

पुणे...१५५०...२०००...१५५०

नाशिक...८६०...१०००...९४०

‘मनरेगा’च्या निकषांमध्ये न बसणाऱ्या लाभार्थ्यांना केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र-२ या योजनेतून तुती लागवड, ठिबक सिंचन सुविधा, कीटक संगोपनगृह बांधकाम तसेच कीटक संगोपन साहित्य खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे.
- बी. डी. डेंगळे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com