Online Government Services : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमअंतर्गत ऑनलाइन सेवांना गती

Maharashtra Public Service Right Act : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ नुसार लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. राज्यातील सर्व नागरिकांना सुलभ, तत्पर आणि कालबद्ध सेवा उपलब्ध करून देणे हा आयोगाचा मुख्य उद्देश आहे.
Maharashtra Public Service Right Act
Maharashtra Public Service Right ActAgrowon
Published on
Updated on

Solapur News : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ नुसार लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. राज्यातील सर्व नागरिकांना सुलभ, तत्पर आणि कालबद्ध सेवा उपलब्ध करून देणे हा आयोगाचा मुख्य उद्देश आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करून आपल्या विभागांतर्गत सर्व सेवा ऑनलाइन पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश पुणे विभाग राज्य हक्क आयोगाचे राज्य आयुक्त डॉ. दिलीप शिंदे यांनी दिले.

Maharashtra Public Service Right Act
Primary Society New Services : प्राथमिक सोसाट्यांतून मिळणार ३२ नव्या सेवा

नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हा आढावा बैठकीत महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त शिंदे बोलत होते. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे प्रमुख, महसूल चे उपविभागीय अधिकारी तहसीलदार आदी उपस्थित होते.

Maharashtra Public Service Right Act
Agriculture Digital Services: जमिनीच्या दाव्यांची माहिती घरबसल्या मिळणार; डिजिटल सेवांचा नवा प्रारंभ

राज्य आयुक्त शिंदे म्हणाले, की शासनाच्या सर्व विभागांची सेवा आपले सेवा सरकार पोर्टलवर जोडण्याचे काम सुरू असून, ते लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे शासनाच्या सर्व सेवा आपले सेवा सरकार पोर्टलवरच उपलब्ध होतील. सद्यःस्थितीत राज्य शासनाच्या ९६९ सेवा पैकी ५३६ सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत, उर्वरित सेवा ऑफलाइन पद्धतीने दिल्या जात आहेत.

२८ एप्रिलला जनजागृती कार्यक्रम

सर्व शासकीय यंत्रणांनी या अंतर्गत आलेल्या ऑनलाइन अर्जावर त्वरित कार्यवाही करून सर्वसामान्य नागरिकांना अत्यंत प्रभावीपणे सेवा उपलब्ध करून देणे बाबत दक्षता घ्यावी, त्याप्रमाणेच २८ एप्रिल २०२५ रोजी लोकसेवा हक्क आयोगाच्या दशकपूर्तीनिमित्त जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर जनजागृती पर कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com