Vadhavan Port : ‘वाढवण’मुळे महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलेल

PM Narendra Modi : परंतु विरोधकांना हा विकास नको आहे. ते महाराष्ट्राला मागे खेचू पाहत आहेत,’’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वाढवण बंदर पायाभरणी समारंभात केला.
PM Narendra Modi
PM Narendra ModiAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : ‘‘वाढवण बंदराकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या बंदरामुळे महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलून जाईल. परंतु विरोधकांना हा विकास नको आहे. ते महाराष्ट्राला मागे खेचू पाहत आहेत,’’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वाढवण बंदर पायाभरणी समारंभात केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या बंदराला सर्वच स्तरातून विरोध होत होता. तरीही लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत वाढवण बंदराला मंजुरी देण्यात आली. दरम्यान, विधानसभा निवडणुकीआधी या बंदराच्या पायाभरणीचा कार्यक्रम करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. पंतप्रधान

PM Narendra Modi
PM Narendra Modi : 'गावांची अर्थव्यवस्था लखपती दिदींमुळे बदलणार' पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा

मोदी म्हणाले,

‘‘महाराष्ट्राचा विकास ही माझी प्राथमिकता आहे. आज मेक इन इंडियाचा, आत्मनिर्भर भारत यांसारख्या योजनांचा लाभ महाराष्ट्राला होत आहे. भारताच्या प्रगतीत महाराष्ट्र मोठी भूमिका बजावत आहे. पण हे दुर्भाग्य आहे की महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी आपल्या विकासावर आपल्या भविष्यावर नेहमी ब्रेक लावण्याचे काम केले आहे.

PM Narendra Modi
PM Narendra Modi : कृषी क्षेत्र देशाच्या आर्थिक धोरणांच्या केंद्रस्थानी : मोदी

आपल्या देशाला कित्येक वर्षांपासून मोठ्या बंदराची गरज होती. पालघर यासाठी सर्वांत उपयुक्त जागा आहे. हे बंदर प्रत्येक हंगामात काम करेल. पण या प्रकल्पाला ६० वर्षांपासून लटकून ठेवले. महाराष्ट्र आणि देशाची ही योजना महत्त्वाची असूनही ती सुरूही होऊ देत नव्हते. २०१४ मध्ये आम्हाला तुम्ही संधी दिली. २०१६ मध्ये महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यावर गंभीरतेने यावर काम सुरू केले.

२०१९ मध्ये पोर्ट सुरू करण्याचा विचार केला. पण सरकार बदलले आणि पुढच्या अडीच वर्षांत यात काम झाले नाही. एका प्रकल्पांमुळे कित्येक लाख कोटींच्या गुंतवणुकीची शक्यता आहे. १२ लाख रोजगार निर्माण होतील. महाराष्ट्रातील रोजगाराला कुणाचा विरोध होता. कुणी काम पुढे नेले नाही. ही गोष्ट महाराष्ट्रातील जनतेने कधीही विसरता कामा नये, असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com