PM Narendra Modi : 'गावांची अर्थव्यवस्था लखपती दिदींमुळे बदलणार' पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा

PM Narendra Modi Jalgaon Visit : आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. २५) जळगाव येथे ‘लखपती दिदीं’च्या मेळाव्यास उपस्थिती लावली. तसेच कार्यक्रमाच्याआधी ‘बचत गटातील’ महिलांशी संवाद साधला.
PM Narendra Modi
PM Narendra ModiAgrowon
Published on
Updated on

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहे. मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी (ता.२५) ‘लखपती दीदीं’चा मेळावा आयोजित करण्यात आला असून येथे बचत गटाच्या महिला सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाच्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगाव विमानतळ परिसरातील असणाऱ्या महिला बचत गटांच्या स्टॉलला भेट देऊन ‘बचत गटातील’ महिलांशी संवाद साधला. तर मेळाव्यात मोदींनी भारताच्या ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था लखपती दीदींच्यामुळे बदलेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे सह मंत्री आणि नेते उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरूवात मराठीतून करताना लाडक्या बहिणींना केंद्र सरकारकडून कोट्यवधींची मदत दिली जाणार असल्याने अभिनंदन केले. तसेच महाराष्ट्रातील महायुती सरकारचेही कौतुक केले. तसेच नेपाळ दुर्घटनेतील जळगावमधील मृतांना श्रद्धांजली वाहताना मृतकांच्या घरच्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून त्यांना मदत दिली जाईल असे आश्वासन मोदी यांनी दिले. यावेळी मोदी यांच्या हस्ते देशभरातील स्वयंसहाय्यता गटांना २ हजार ५०० कोटी रुपयांचा फिरता निधी व ५ हजार कोटी रुपयांचे बँक अर्थसहाय्याचे वितरण करण्यात आले. याच कार्यक्रमात समुदाय संसाधन व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. तसेच लखपती दीदी संमेलनादरम्यान ११ लाख लाखपती दीदींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच नेपाळ दुर्घटनेतील जळगावमधील मृतकांच्या घरच्यांना मदत निधी देखील देण्यात आला.

PM Narendra Modi
PM Narendra Modi : कृषी क्षेत्र देशाच्या आर्थिक धोरणांच्या केंद्रस्थानी : मोदी

यावेळी मोदी यांनी लोकसभा निवडणुकीतील किस्सा सांगताना, निवडणुकीवेळी तीन कोटी बहिणींना लखपती दिदी बनवायचे माझे ध्येय मी बोलून दाखवले होते. त्याप्रमाणे १ कोटी महिलांना लखपती दिदी बनवलं. आता यात अजून ११ लाख लाखपती दिदींची भर पडत आहे. पण लखपती दिदी बनवण्याची ही मोहीम केवळ बहिण, मुलींची कमाईसाठी नसून ती पूर्ण कुटुंबाला, येणाऱ्या पिढीला सशक्त करण्याचं महाअभियान असल्याचे मोदी म्हणाले.

तसेच लखपती दीदींमुळे गावांची अर्थव्यवस्था बदलणार असल्याचा असा विश्वास मोदी यांनी यावेळी बोलून दाखवला. तर माझा मातृशक्तीवर विश्वास असून आधी काही लोक म्हणायचे महिलांना कर्ज देऊ नका, त्या कर्ज फेडणार नाहीत. पण महिला कर्जाचा एक ना एक रूपया फेडत आहेत. त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनत असल्याचे मोदी म्हणाले. तीन कोटी बहीणींना लखपती दीदी बनवयाची आहे. दोन महिन्यात देशात ११ लाख दीदी या लखपती दीदी बनल्या आहेत. एक महिला कुटुंबांचे भवितव्य बदलत आहे. आमच्या सरकारने महिलांसाठी अनेक योजना आणल्या. या योजनांच्या माध्यमांतून देशाला सक्षम बनवण्याचे काम नारीशक्ती करीत आहेत. तसेच या ठिकाणी देशभरातून लाखो बचत गटांसाठी सहा हजार कोटीहून अधिकची रक्कम जाहीर केली असून महाराष्ट्रातील महिलांना कोट्यवधी रुपयांची मदत मिळाली आहे. तर या पैशातून लाखो बहिणींना लखपती दिदी बनविण्यात मदत मिळाल्याचे मोदी म्हणाले.

राज्यासह केद्र सरकार महिलांसाठी वेग वेगळ्या योजना आखत असून बँकांशी संबंधित अनेक कामांवर देखील लक्ष देत आहे. जनधन खात्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास यात सर्वाधिक खाते महिलांची उघडली गेल्याचे मोदी म्हणाले. तर मुद्रा योजनेतून विना गॅरंटी कर्ज दिले जात असून या योजनेचा ७० टक्के महिलांनी लाभ घेतला आहे. आता मुद्रा योजनेची मर्यादा २० लाखांवर नेल्याचे मोदी म्हणाले.

PM Narendra Modi
PM Narendra Modi : शंभर दिवसांत एक प्रभावी प्रकल्प द्या

यावेळी मोदींनी बदलापूर आणि कोलकाता घटनांच्या पार्श्वभूमीवर देखील भाष्य केले. मोदी म्हणाले, महिलांवरील होणारे अत्याचार अक्षम्य पाप असून दोषी कोणीही असो त्याला सोडू नका. कोणत्याही ठिकाणी निष्काळजीपणा होत असेल तर त्याचा हिशोब केला जाईल. सरकारे येतील आणि जातील. पण नारीची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. महिला हित सर्वाधिका महत्वाचे असल्याचे मोदी म्हणाले.

यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, देशाला महाशक्ती करायचे असेल तर महिलांचा सहभाग असणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. तसेच शिंदे यांनी राज्यातील कांदा, दूध उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मोदींना सांगितली. तर कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणण्यावरून पुन्हा एकदा केंद्राकडून विचार करण्यात यावा अशी विनंती शिंदे यांनी मोदींकडे केली आहे. याशिवाय सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसह दूध उत्पादकांचे विविध प्रश्नांवर देखील पंतप्रधान मोदी यांनी विचारपूर्वक तोडगा काढवा असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी विनंती केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com