Sangali News: राज्यात सातत्याने वातावरणात बदल होत असल्याने द्राक्ष पीक संकटाच्या चक्रव्यूहात अडकले आहे. परिणामी गळकूज, रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच पोंगा अवस्थेत असलेल्या बागांमध्ये घड जिरण्याची समस्या वाढली आहे. द्राक्ष बागायतदारांच्या चेहऱ्यावर चिंता दाटली असून गोड स्वप्नेही विरली आहेत. नैसर्गिक संकटामुळे उत्पादन ५५ टक्क्यांपर्यंत कमी होईल, असा प्राथमिक अंदाज द्राक्ष बागायतदार संघाने व्यक्त केला आहे..राज्यात चार लाख एकरांवर द्राक्ष पीक विस्तारले आहे. गेल्या काही दिवसांपासून फळ छाटणी सुरू केली आहे. अनेक भागांत अजूनही फळ छाटणी सुरू आहे. आजअखेर सुमारे ७० टक्के म्हणजे २ लाख ८० हजार एकरांपर्यंत फळ छाटणी उरकली आहे..Grape Farmers : द्राक्ष बागांसाठी विशेष पॅकेजसाठी प्रयत्नशील .द्राक्षाच्या एकूण क्षेत्रापैकी २८ हजार एकर म्हणजे १० टक्के क्षेत्र फुलोऱ्या पूर्वीच्या अवस्थेत (प्री ब्लूम) तर ७५ हजार ६०० एकर म्हणजे ३० टक्के क्षेत्र पोंगा अवस्थेत आहे. राज्यात यंदा सलग पाऊस असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अगोदरच निसर्गाच्या लहरीपणामुळे सूक्ष्मघड निर्मिती झाली नाही. जे घड तयार झाले आहेत, ते कमकुवत आहेत..राज्यातील विविध भागांत मॉन्सूनोत्तर पावसाने हजेरी लावली. यामुळे फुरोऱ्या पूर्वीच्या व पोंगा अवस्थेत असलेल्या बागांना याचा मोठा फटका बसू लागला असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान सकाळी थंडी, धुके, दुपारी ऊन आणि सायंकाळी पाऊस असे एकाच दिवसात तीन प्रकारचे वातावरण होत आहे. यामुळे बागांमध्ये प्रादुर्भाव वाढत आहे. या साऱ्यामुळे जे घड तयार झाले आहेत, त्यांचे बदलत्या वातावरणामुळे पोषण झाले नाही. तसेच निसर्गाच्या आपत्तीने घड जिरण्याचे प्रमाण वाढले आहे..Grape Farmers : थकित खातेदारांना हवे कर्ज.मजूर टंचाईचा करावा लागतोय सामनारब्बी हंगामाची चाहूल लागल्याने शेतकऱ्यांच्या शिवारात पुन्हा हालचाल वाढली आहे. त्याचवेळी द्राक्षबागांमध्ये फळछाटणी आणि फेलफूट या महत्त्वाच्या कामांची लगबग सुरू आहे. या दोन्ही हंगामी कामांच्या एकत्रित काळात मजुरांची मोठी टंचाई जाणवत असून बागायतदारांना मजूर मिळण्यात अडचणी येत आहेत. मजूर उपलब्ध न झाल्याने फळछाटणी, फवारणी, पाणी व्यवस्थापन अशा कामांमध्ये विलंब होत आहे. या टंचाईमुळे द्राक्षबागेतील नियोजन बिघडत आहे..द्राक्ष पीक वाचवण्यासाठी शासनाने द्राक्ष बागायतदार संघाला सोबत घेऊन विशेष आर्थिक धोरणासह बाग लागवडीसाठी नवा आराखडा तयार करावा. पीकविम्याचे निकष बदलावेत आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी केली तरच द्राक्ष पीक टिकेल. - मारुती चव्हाण, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बागायतदार संघ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.