Electricity Consumption Rates : महाराष्ट्राची दिवाळी देशात सर्वाधिक महागडी

Electricity Update : दिवाळी उंबरठ्यावर आली. पण यंदा दिवाळीची रोषणाई इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात सर्वांत महागडी ठरणार आहे. कारण महाराष्ट्रात वीज वापराचे दर अन्य सर्व राज्यांपेक्षा अधिक आहेत.
Electricity
ElectricityAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : दिवाळी उंबरठ्यावर आली. पण यंदा दिवाळीची रोषणाई इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात सर्वांत महागडी ठरणार आहे. कारण महाराष्ट्रात वीज वापराचे दर अन्य सर्व राज्यांपेक्षा अधिक आहेत.

दिवाळीसाठी आतापासूनच प्रकाशोत्सव सुरू झाला आहे. रोज लागणारा आकाश कंदील, टिमटिमत्या ‘सीरिज’चा लखलखाट, घरासह अंगणातही उजेडाची तजवीज केली जात आहे. पण यंदा हा उजेडाचा सोस आवरावा लागणार आहे. घरगुती वीज ग्राहकांना १०० युनिटपर्यंत आणि दुकानदारांना साधारण ३०० युनिटपर्यंत वीज वापरासाठी सवलतीचे दर लागू आहेत.

Electricity
Electricity Bill : राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांचे वीजबिल माफ

परंतु दिवाळीत विजेचा वापर साहजिकच या मर्यादेपेक्षा पुढे जाणार आहे. त्यामुळे घसघशीत दर लागू होणार आहेत. त्यामुळे दिवाळीतील रोषणाई आटोक्यात ठेवण्याची गरज आहे. नाहीतर आधीच इतर राज्यांपेक्षा अधिक असलेले दर दिवाळीत तुमचे तेल काढल्याशिवाय राहणार नाहीत. तर दुसरीकडे, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने याबाबत ‘अपेक्षानामा’ जाहीर करत हे दर कमी करण्यासाठी निवडणुकीतील उमेदवारांना साकडे घातले आहे.

वीज ‘सरप्लस’, तरी जादा दराचा भुर्दंड

महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या म्हणण्यानुसार, ‘या वर्षी राज्यात ३९ हजार दशलक्ष युनिट्स म्हणजेच किमान साडेपाच हजार मेगावॉट वीज सरप्लस (अतिरिक्त) आहे. म्हणजेच शिल्लक आहे. पण या वीज निर्मिती क्षमतेच्या स्थिर आकारापोटी राज्यातील प्रत्येक ग्राहकाला प्रति युनिट ५० पैसे जादा दराने बिल आकारले जात आहे.’ असे असताना स्थानिक कारणांमुळे दररोज वीजपुरवठा कुठे एक तास तर कुठे दोन तास खंडित होत आहे.

Electricity
Electricity Bill : सरसकट शेतीपंपांचे वीजबिल माफ करण्याची मागणी

त्यामुळे एकीकडे कंपनीचा वार्षिक महसूल पाच हजार कोटीने कमी गोळा होतोय, तर दुसरीकडे ग्राहकांनाही भुर्दंड पडतोय. हे नुकसान टाळण्यासाठी पायाभूत सुधारणा करून अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केली आहे.

राज्यनिहाय वीज वापराचे प्रति युनिट दर (रु.) (घरगुती/वाणिज्यिक)

राज्य इनिशिअल स्लॅब लास्ट स्लॅब

महाराष्ट्र ५.८८/९.६९ १७.८१/१६.५५

आंध्र प्रदेश ३.००/६.६५ ९.७५/७.६५

गुजरात ३.०५/४.३५ ५.२०/४.७०

हरियाना २.५०/२.७५ ७.१०/७.१०

हिमाचल प्रदेश ५.६०/६.२१ ६.२५/६.५२

बिहार ७.४२/७.७३ ९.०३/८.९३

छत्तीसगड ३.९०/६.०५ ८.१०/८.४५

दिल्ली ३.००/६.०० ८.००/८.५०

मध्य प्रदेश ४.२७/६.३० ६.८०/७.८०

कर्नाटक ५.९०/८.०० ५.९०/८.००

पंजाब ४.२९/६.७५ ७.७५/७.७५

राजस्थान ४.७५/७.५५ ७.९५/८.९५

तमिळनाडू ४.८०/६.४५ ११.८०/१०.१५

तेलंगण ३.१०/७.०० १०.००/१३.००

झारखंड ६.३०/६.१० ६.३०/६.१०

उत्तर प्रदेश ६.५०/७.५० ६.५०/८.७५

उत्तराखंड ३.४०/५.४० ७.३५/८.२०

पश्‍चिम बंगाल ३.४५/४.३१ ४.९९/५.०५

अरुणाचल प्रदेश ४.००/५.०० ४.००/५.००

आसाम ६.००/९.१९ ८.२५/९.१९

गोवा १.९०/३.७५ ५.८०/५.७५

काश्मीर, लडाख २.३०/३.५५ ४.३५/५.८५

केरळ ३.२५/६.०५ ८.८०/९.४०

ओडिशा २.९६/५.९० ६.१०/७.६०

त्रिपुरा ४.४८/६.५४ ८.३२/८.४६

त्या त्या राज्यातील वीजदराचे ताजे ‘टॅरिफ’ पाहिल्यास महाराष्ट्रात वीजवापर सर्वांत महाग असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे यापुढे सरकारमध्ये येणाऱ्या उमेदवारांनी विजेचे दर रास्त करण्यासाठी प्रयत्न करावे, एवढाच आमचा ‘अपेक्षानामा’ आहे.
प्रताप होगाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com