Hasan Mushrif : धार्मिक स्थळांच्या विकास करून भाविकांना सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करणार : हसन मुश्रीफ

Hasan Mushrif Speech: सोलापूर जिल्ह्यात धार्मिक पर्यटन स्थळांना विशेष महत्त्व आहे, याच अनुषंगाने ७३ कोटी ८० लाख रुपयांचा पंढरपूर मंदिर विकास आराखडा, तर ३६८ कोटी रुपयांच्या अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला राज्य शिखर समितीने मान्यता दिलेली आहे.
Hasan Mushrif
Hasan MushrifAgrowon

Maharashtra Politics : सोलापूर जिल्ह्यात धार्मिक पर्यटन स्थळांना विशेष महत्त्व आहे, याच अनुषंगाने ७३ कोटी ८० लाख रुपयांचा पंढरपूर मंदिर विकास आराखडा, तर ३६८ कोटी रुपयांच्या अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला राज्य शिखर समितीने मान्यता दिलेली आहे.

त्याप्रमाणेच श्री क्षेत्र हत्तरसंग-कुडल तीर्थक्षेत्र विकासासाठी १७३ कोटी २६ लाखांच्या आराखड्यालाही शासनाची लवकरच मान्यता मिळेल. त्यामुळे जिल्ह्यातील धार्मिक स्थळांचा विकास करून भाविकांना सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष साह्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

Hasan Mushrif
Solapur Sowing : बार्शी, करमाळा पेरणीविना; पंढरपूर, मोहोळ, माढ्यामध्ये केवळ 2 टक्के क्षेत्रावरच पेरणी

नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाचे ध्वजवंदन वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर पालिकेच्या आयुक्त शीतल उगले-तेली, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, सोलापूर शहर पोलिस आयुक्त राजेंद्र माने, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार उपस्थित होते.

श्री. मुश्रीफ म्हणाले, की जिल्ह्यात ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी सुमारे एक लाख २३ हजार बाधित शेतकऱ्यांना १९१ कोटी ७३ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झालेले होते, त्यापैकी एक लाख २० हजार शेतकऱ्यांना १६० कोटींचे वाटप करण्यात आलेले आहे.

महामार्गामुळे विकासाला गती

केंद्र शासनाच्या भारतमाला परियोजनेअंतर्गत सुरत-चेन्नई या प्रकल्पाची सोलापूर जिल्ह्यात १५३.३३ किलोमीटरची लांबी असून, एक हजार १८० हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आलेले आहे.

जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत आठ, सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत चार व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांतर्गत पाच अशा एकूण १७ रस्त्यांच्या भूसंपादनाचे काम पूर्ण झालेले असून ५७ हजार खातेदारांना ३ हजार ८०० कोटी रुपये भरपाई रक्कम देण्यात आलेली आहे.

या सर्व महामार्गांच्या जाळ्यामुळे सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळणार असल्याचे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com