Maharashtra Waqf Board : वल्फची लातूरच्या १०० शेतकऱ्यांना नोटीस; ३०० एकर जमिनीवर ठोकला दावा

Maharashtra Waqf Board Claim Latur Farmers Land : देशातील राजकारण वक्फ बोर्ड विध्येयकाच्या दुसरूस्तीवरून फिरत आहे. देशात अनेक ठिकाणी वक्फ बोर्डाने शेतकऱ्यांच्या जमिनींवर दावा केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
Waqf Board
Waqf BoardAgrowon
Published on
Updated on

Pune News : देशातील राजकारण वक्फ बोर्ड विध्येयकाच्या दुसरूस्तीवरून तापले आहे. सध्या यावरून संसदेच्या हिवाळी अधिवेशात देखील विरोधकांनी गदारोळ केला होता. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वक्फ बोर्ड विध्येयकात दुसरूस्ती होणारच असे सांगितले आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यात वक्फ बोर्डाने लातूरमध्ये दावा ठोकल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे मराठवाड्यासह राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तळेगाव या गावावरच बोर्डाने दावा ठोकला आहे. येथील १०३ शेतकऱ्यांना जमिनीबाबत नोटीस बजावली असून बोर्डाने ३०० एकर जमिनीवर दावा सांगितला आहे. यामुळे ग्रामस्थांनी रोष व्यक्त करताना याप्रकरणी राज्य सरकारने हस्तक्षेप करावा, अशी विनंती केली आहे.

Waqf Board
JPC On Waqf Board : भाजपचे आरोप आणि तणावानंतर जेपीसीची कर्नाटक वल्फ बोर्ड प्रकरणात उडी; घेणार तक्रारदार शेतकऱ्यांची भेट

तळेगावातील लोक कित्येक पिढ्यापासून येथे राहत असून ते आपल्या जमिनीवर शेती करत आहेत. दरम्यान वक्फ बोर्डाने या जमिनी आपल्या मालकीच्या असल्याचा दावा केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणात प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. तर याप्रकरणी न्यायाधिकरणाने गावातील १०३ शेतकऱ्यांना नोटीस बजावली आहे. यामुळे गावातील शेतकरी सध्या चिंताग्रस्त असून त्यांनी बोर्ड आमच्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न करत आहे. या जमिनींवर आमचा हक्क असून त्या बोर्डाच्या नसल्याचा दावा केला आहे.

७५ टक्के जमिनीवर दावा

वक्फ न्यायाधीकरणाने बजावलेल्या नोटीसमध्ये, गावातील १०३ शेतकऱ्यांची ३०० एकर जमीन म्हणजेच ७५ टक्के जमिनीवर दावा केला आहे. आतापर्यंत याप्रकरणी दोन सुनावण्या पार पडल्या असून पुढील सुनावणी २० डिसेंबरला होणार आहे. याआधी सरकारने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांनी केली आहे.

Waqf Board
Karnataka Waqf Board : कर्नाटकमध्ये वक्फ बोर्डवरून वाद चिघळला; हावेरी जिल्ह्यातील कडाकोल गावात तणाव; भाजप करणार ४ तारखेला आंदोलन

तसेच येथे गेल्या चार पिढ्यांपासून आम्ही शेती करत असून असे अचानक वक्फ बोर्ड कसा दावा करू शकतो, असा सवाल देखील शेतकऱ्यांनी केला आहे. तर दावा केलेल्या जमिनी जर त्यांच्या आहेत तर वक्फ बोर्ड इतके दिवस झोपलं होतं का? असा संतप्त सवाल देखील शेतकऱ्यांनी केला आहे.

वार-पलटवार

दरम्यान याप्रकरणावरून भाजपने काँग्रेसवर हल्लाबोरल करताना, हे पाप तत्कालीन काँग्रेस सरकारचे असल्याची टीका भाजप आमदार योगेश सागर यांनी केली आहे. तर यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, याची सविस्तर माहिती आपल्याकडे नाही. जर शेतकरी त्याचे मालक असतील तर वक्फ बोर्डच काय तर कोणीही त्यांच्या जमिनी घेऊ शकत नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी असून यावर माहिती घेऊन उत्तर देवू, असे म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com