Maharashtra ITI upgrade : राज्यातील शंभर ‘आयटीआय’चे बळकटीकरण करणार

ITI In Maharashtra : राज्यातील आयटीआयमध्ये नवीन तंत्रज्ञानावर आधारित सहा नवीन अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत.
ITI Maharashtra
ITI MaharashtraAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : राज्य शासनाचे ५ हजार ४०० कोटी, जिल्हा नियोजनाचे ३६० कोटी व केंद्र शासनाकडून राज्यातील १०० ‘आयटीआय’चे होणारे बळकटीकरण, या माध्यमातून राज्यातील सर्व आयटीआयमध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती होणार असून वर्षभरात आयटीआय संस्थांचा चेहरामोहरा बदलल्याचे चित्र दिसेल, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नावीन्यता मंत्री अ‍ॅड. मंगलप्रभात लोढा यांनी केले.

अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री अ‍ॅड. लोढा यांनी राज्यातील आयटीआय व विकास कौशल्याबाबतच्या नव्या नियोजन आणि केल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘राज्यातील आयटीआयमध्ये नवीन तंत्रज्ञानावर आधारित सहा नवीन अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. आयटीआयच्या शिक्षकांचा सन्मान वाढावा, यासाठी त्यांना कौशल्यवृद्धी प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात आली आहे.

आयटीआय अभ्यासक्रमांना पदवीसमान दर्जा देण्याबाबत केंद्र शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. राज्यातील आयटीआयमध्ये दोन ते तीन महिन्यांचे अल्पकालावधीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. इच्छुक संस्था व आयटीआय यांनी त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.’’

ITI Maharashtra
Government ITI Division : अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये सुरू होणार नव्या २७६ तुकड्या

ते म्हणाले, की सध्या राज्यात सुमारे ७०० जण तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्यात येईल व उत्तीर्ण झालेल्यांना नियमित सेवेत घेण्यात येईल. लॉर्ड मॅकोलेच्या पारंपरिक शिक्षण पद्धतीऐवजी आता तांत्रिक व कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य देण्याची गरज आहे.

महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक स्टार्टअप्स आहेत. आतापर्यंत ३५ लाख तरुणांनी कौशल्य अभ्यासक्रम पूर्ण केले असून, त्यांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यातून निवडलेल्या ५ लाख तरुणांना कर्ज व अनुदानाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना प्रस्तावित आहे. शासन त्यांच्यासाठी मोफत सल्ला व मार्गदर्शन उपलब्ध करून देईल.

निवड झालेल्या तरुणांच्या कर्जावरील ५० टक्के व्याज शासन भरणार असून, उत्कृष्ट २५ हजार तरुणांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी विशेष उत्तेजन देण्याचा शासनाचा मानस आहे. राज्य शासनाचे ५ हजार ४०० कोटी, जिल्हा नियोजनाचे ३६० कोटी व केंद्र शासनाकडून राज्यातील १०० आयटीआयचे होणारे बळकटीकरण, या माध्यमातून राज्यातील सर्व आयटीआयमध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती होणार असून वर्षभरात आयटीआय संस्थांचा चेहरामोहरा बदलण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे श्री. लोढा यांनी सांगितले.

ITI Maharashtra
ITI Partnership: आयटीआय’मध्ये खासगी भागीदारी

या वेळी आमदार विक्रम पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे नाशिक विभागीय सहसंचालक अनिल गावित उपस्थित होते.

ड्रोन तंत्रज्ञान देणार ः लोढा

श्री. लोढा म्हणाले, ‘‘औद्योगिक क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. राज्यातील शेतकरी ड्रोनद्वारे फवारणीकडे वळत आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) काळानुसार अभ्यासक्रम बदल करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. थ्रीडी प्रिंटिंग, इंडस्ट्रीज रोबोटिक, ड्रोन, इलेक्ट्रिकल्स वाहन देखभाल दुरुस्ती, सौर ऊर्जा उपकरणे, एआय प्रोग्राम मदतनीस असे नवीन अभ्यासक्रम सुरू केले जातील.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com