Sand Policy Maharashtra : राज्यात नवीन वाळू धोरण येणार; महसूल मंत्री बावनकुळे यांची विधीमंडळात माहिती

Sand Rate : नवीन धोरणानुसार प्रत्येक डेपोवर घरकुल वाळूसाठी झिरो रॉयल्टी आरक्षण दिलं जाणार आहे, असं मंत्री बावनकुळे यांनी जाहीर केलं. त्यामुळे राज्यातील घरकुल लाभार्थीना फायदा होईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
Sand Policy Maharashtra
Sand Policy MaharashtraAgrowon
Published on
Updated on

Minister Bawankule : राज्यात नवीन वाळू धोरण पुढच्या आठवड्यापासून लागू होणार आहे. त्यामुळे वाळू माफिया कमी होईल. तसेच राज्यातील घरकुल योजनेतील लाभार्थीना ५ ब्रास मोफत वाळू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी (ता.१७) विधीमंडळात दिली आहे.

नवीन धोरणानुसार प्रत्येक डेपोवर घरकुल वाळूसाठी झिरो रॉयल्टी आरक्षण दिलं जाणार आहे, असं मंत्री बावनकुळे यांनी जाहीर केलं. त्यामुळे राज्यातील घरकुल लाभार्थीना फायदा होईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात वाळूसह एम सॅन्ड धोरण आणलं जाणार आहे, असंही बावनकुळे यांनी जाहीर केलं. राज्यात दगडांपासून वाळू तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे वाळू माफिया कमी होईल, असंही बावनकुळे म्हणाले. नवीन वाळू धोरण अर्थ विभागाकडे पाठवण्यात आलं. त्यामुळे एक आठवड्यात वाळू धोरण राबवलं जाईल, अशी माहिती महसूल मंत्र्यांनी केली आहे.

यावेळी महसूल विभागाने जप्त केलेली वाहनांचा लिलाव करण्याची मागणी विरोधकांसह सत्ताधारी आमदारांकडून करण्यात आली. तर भाजपचे आमदार सुधीर मुंगटीवार यांनी सरकारने जप्त केलेली वाहनं सरकारच्या नावावर करून घ्यावीत. त्यानंतर बचत गट असतील किंवा विविध समाज घटक असतील, त्यांना या वाहनांचं वाटप करावं. जेणेकरून त्याचा फायदा होईल. केवळ महसूल विभागात वाहनं उभी करून प्रश्न सुटणार नाही, अशी मागणी मुंगटीवार यांनी केली.

यावर महसूल विभाग याबद्दल अभ्यास करून निर्णय घेईल, असं आश्वासन बावनकुळे यांनी दिलं. तसेच वन विभागाने या प्रकारचे निर्णय घेतले होते, त्या निर्णयाचाही अभ्यास करण्यात येईल, अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यात वाळू माफियाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होऊ लागला आहे. विविध ठिकाणी अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन घातल्याचे प्रकारही समोर येऊ लागले आहेत, यावरून आमदार भास्कर जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही बावनकुळे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com