
Pune News : ‘‘व्यापारी हा अर्थव्यवस्थेचा कणा असून पंतप्रधानांनी फाइव्ह ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेचे जे स्वप्न पाहिले आहे, त्यात महाराष्ट्राचे निदान एक ट्रिलियन योगदान अपेक्षित असून या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र भरीव योगदान देईल,’’ असा विश्वास पणन व राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.
दि पूना मर्चंट्स चेंबरतर्फे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील नव्याने नियुक्त मंत्री, खासदार आणि पुणे शहरातील नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार समारंभ गुरुवारी (ता. ९) आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पणन व राजशिष्टाचारमंत्री श्री. रावल बोलत होते. याa वेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील,
क्रीडा व अल्पसंख्याक विकासमंत्री दत्तात्रय भरणे, राज्याच्या शहर विकास, वाहतूक राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, आमदार चेतन तुपे, हेमंत रासने, भीमराव तापकीर, राजकुमार चोरडिया, राजेश फुलपगर, भालचंद्र कटारिया आदी उपस्थित होते.
श्री. रावल म्हणाले, की व्यापाऱ्यांना सर्व स्तरावर पाठबळ देऊन व्यापार करण्यासाठी लागणाऱ्या परवान्यांपासून वितरणापर्यंत सर्व व्यवस्था मजबूत करण्यात येईल. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पारंपरिक कृषी क्षेत्र मोठा वाटा उचलत असताना, शेतकरी मात्र विकासापासून वंचित राहतो. त्यामुळे शेतकऱ्यांकडून ग्राहकांपर्यंत माल पोहोचत असताना होणारे त्याचे नुकसान टाळण्यासाठी देखील यंत्रणा उभारण्यात येणार आहे.
शहर विकास, वाहतूक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, की दि पूना मर्चंट चेंबरला ज्या समस्या भेडसावत होत्या, त्या आम्ही आजवर सोडवत आलेलो आहोत. भविष्यातही या समस्या आम्ही सोडवू, परंतु समस्यांच्या पलीकडे जाऊन चेंबरने अजून काही ठोस प्रस्ताव दिल्यास त्या ठोस प्रस्तावांना देखील आम्ही प्रतिसाद देऊ.
मुळात प्रश्न समजून घेण्याची आणि काम करण्याची वृत्ती आवश्यक असते. या दोन्ही वृत्ती मुख्यमंत्री आणि पणन मंत्र्यांच्या रूपाने महाराष्ट्राला लाभल्याने व्यापाऱ्यांचे प्रश्न लवकर सुटतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास धारणे यांनी केले. सहसचिव आशिष दुगड यांनी आभार मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.