Economic Growth : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २७७ कोटींचे ३६ करार

District Progress : छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय खरेदीदार विक्रेता संमेलनात २७७ कोटींचे ३६ करार करण्यात आले
District Progress Agreement
District Progress AgreementAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय खरेदीदार विक्रेता संमेलनात २७७ कोटींचे ३६ करार करण्यात आले. या संमेलनात स्मार्ट प्रकल्पांतर्गत २६ समुदाय आधारित संस्थांसह १२ खरेदीदार सहभागी झाले होते.

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अर्थात स्मार्ट प्रकल्पांतर्गत जिल्हास्तरीय खरेदीदार विक्रेता संमेलनाचे शुक्रवारी (ता. २७) आयोजन करण्यात आले होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. सूर्यकांत पवार, कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयिका गीता यादव, स्मार्टचे नोडल अधिकारी अनिल साळुंके आदींची या संमेलनाला प्रामुख्याने उपस्थिती होती.

District Progress Agreement
Agriculture Development : शेती, पूरक उद्योगाला मिळाली नवी दिशा

प्रास्ताविकात श्री. साळुंके म्हणाले, की समुदाय आधारित संस्थांना त्यांच्या शेतीमाल, प्रक्रिया केलेला माल, प्रकल्पातील सर्व समुदाय आधारित संस्थांचा शेतमाल मूल्यवर्धित मालाची विक्री व्यवस्था निर्माण करणे हे प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी आवश्यक आहे. यासाठी मूल्य साखळीतील खरेदीदार व विक्रेते या महत्त्वाच्या घटकांना एकाच मंचावर आमंत्रित करून त्यांच्यामध्ये संवाद व खरेदी करार घडवून आणणे हा खरेदीदार विक्रेता संमेलन आयोजित करण्यामागचा मुख्य उद्देश होता.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मका प्रक्रिया उद्योगांमध्ये काम करणाऱ्या ७१ कंपन्यांचा प्राथमिक मान्यता प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. विविध पिकांमध्ये काम करणाऱ्या २६ कंपन्यांना मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी ज्या समुदाय आधारित संस्था कार्यान्वित आहेत व काम प्रगतिपथावर अशा समुदाय आधारित संस्थाकरिता प्रामुख्याने हे संमेलन घेतले गेले.

District Progress Agreement
Agricultural Development : कृषी विज्ञान संकुलामुळे कृषिक्षेत्राला मिळाली नवी दिशा

यामध्ये रिलायन्स रिटेल, अव्हेन्यू सुपर मार्केट (डी मार्ट), गोदरेज ॲग्रोवेट, सीपी सीड्स इंडिया, पी व्ही सन्स कॉर्न मिलिंग, एस. फॉर एस. टेक्नॉलॉजी, प्राइम फ्रेश आदी कंपनीचे खरेदीदार प्रतिनिधी या संमेलनात प्रामुख्याने सहभागी झाले होते. त्यांच्याशी धान्य, फळे व भाजीपाला, पशुखाद्य आणि शेळी आदींचे अंदाजे ४३ हजार ८३० टनांचे २७७ कोटींचे ३६ करार करण्यात आले.

७१२ समुदाय आधारित संस्थांना मंजुरी...

स्मार्ट प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्रातील ७१२ समुदाय आधारित संस्थांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी कडधान्य व डाळवर्गीय ४१२ संस्थांसह, तेलबियामध्ये काम करणाऱ्या ६९, भाजीपाला व फळामध्ये काम करणारे १४३, मसालेमध्ये काम करणाऱ्या २२, कुक्कुटपालन तसेच कापूस उत्पादनात काम करणाऱ्या २८,

समुदाय आधारित संस्थांचा समावेश आहे. सुमारे ३८५ गोदाम बांधकाम, ५२ कांदा साठवणूक शेड, ६१ शीतगृह, ४०४ प्राथमिक प्रक्रिया, ११७ डाळ मिल, ५९ आटा मिल, ६९ राइस मिल, ३२९ अवजारे बँक पशुखाद्य निर्मिती आदी समुदाय आधारित संस्थांच्या उप प्रकल्पांना परवानगी देण्यात आल्याची माहिती स्मार्टच्या यंत्रणेकडून देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com