Protest Cases Withdrawal Deadline Extended: राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील प्रलंबित खटले मागे घेण्याबाबतच्या शासन निर्णयात सुधारणा करण्यात आली आहे. विविध आंदोलनातील ज्या गुन्ह्यांमध्ये ३१ मार्च २०२७ पर्यत दोषारोपपत्रे दाखल होतील, असे खटले मागे घेण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा सुधारित शासन निर्णय गृह विभागाने जारी केला आहे. .राजकीय पक्ष तसेच विविध सामाजिक संघटनांकडून सार्वजनिक हिताच्या व वेगवेगळ्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी घेराव घालणे, मोर्चे काढणे, निदर्शने करणे आदी स्वरुपाचे आंदोलनाचे मार्ग अनुसरले जातात. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कायद्याचे उल्लंघन केल्याने गुन्हे दाखल होतात. यासंदर्भातील तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्रे दाखल केली जातात. राजकीय व सामाजिक आंदोलनामुळे उद्भवलेल्या ज्या गुन्ह्यांमध्ये ३१ जुलै २०२६ पर्यंत दोषारोपपत्र दाखल झालेले आहेत, असे खटले मागे घेण्यास २१ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये मंजुरी दिली होती. .Farmer Protest: नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख द्या, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, 'स्वाभिमानी'च्या कार्यकारिणी बैठकीत १२ ठराव.पण सद्यस्थितीत खटले काढून घेण्यासाठी असलेली ३१ जुलै २०२६ पर्यंतची मुदत संपली आहे. तसेच दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनात सहभागी विद्यार्थी, तरुण व इतर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्यांच्या अनुषंगाने दाखल झालेले खटले मागे घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुषंगाने राजकीय व सामाजिक आंदोलनातील दोषारोपपत्रे दाखल झालेले खटले मागे घेण्याच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. .CJP Protest: सरकारनं शब्द पाळवा अन्यथा पुन्हा आंदोलन करु, पोलिसांच्या कारवाईवरुन 'सीजेपी'चा निर्वाणीचा इशारा.दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे जोरदार पडसाद महाराष्ट्रात उमटले होते. मुंबई, पुणे आणि राज्यातील इतर शहरांमध्ये तरुणांनी कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ आंदोलने केली होती. यामुळे विद्यार्थी, तरुणांवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. दिल्लीतील आंदोलन मागे घेतल्यानंतर राज्यभरातील आंदोलनाची धग थांबली होती. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.