Onion Rate : महाराष्ट्र कांदा उत्पादक संघर्ष समितीचे होळीच्या दिवशी राज्यव्यापी आंदोलन

रब्बी कांद्याचे पीक अजून शेतात असतानाच कांद्याच्या दर कोसळले. मात्र राज्य सरकार सत्तासंघर्षात मश्गुल आहे.
Onion Rate
Onion Rate Agrowon

Onion Market Update : राज्यातील कांद्याचे दर (Onion Rate) कोसळल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे ६ मार्चपासून होळी सणाचे (Holi Festival) औचित्य साधून राजव्यापी आंदोलन (Onion Farmer Protest) महाराष्ट्र कांदा उत्पादक संघर्ष समितीकडून पुकारण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन समितीने प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

तसेच शेतकऱ्यांनी स्वतःच्या गळ्यात, घरादाराला व दुकानांना, आपापली मोटरसायकल, ट्रॅक्टर इत्यादी साधने, सरकारी बसेस व रेल्वे तसेच सरकारी कार्यालयाला कांद्याच्या माळा घालून सरकारचे लक्ष वेधण्याचे आंदोलन छेडण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आला आहे.

Onion Rate
Onion Rate : कांदा प्रश्नावर राहुरीत आज ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

रब्बी कांद्याचे पीक अजून शेतात असतानाच कांद्याच्या दर कोसळले. मात्र राज्य सरकार सत्तासंघर्षात मश्गुल आहे. त्यांनी शेतकऱ्यांवरच्या संकटाकडे दुर्लक्ष केले, असेही समितिने म्हंटले आहे.

Onion Rate
Onion Rate : कांदा करणार सरकारचा 'वांदा'; गळ्यात कांद्याच्या माळा घालून विरोधकांचं आंदोलन

जगभर कांद्याला चांगली मागणी असताना कांदा निर्यातीला चालना देण्याऐवजी शेतकऱ्यांना बुडवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न चालू आहे.

तरी सर्व शेतकऱ्यांनी आंदोलनात उतरून कांदा आंदोलनाची तीव्रता वाढवावी, होळी सणाच्या दिवशी आपापल्या तहसील कार्यालयाला कांद्याच्या माळा अर्पण करून निषेध नोंदवावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघर्ष समितीने केले आहे.

मागण्या

- कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित किमान २५००/- रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा.

- कमी दराने खरेदी झालेल्या लाल व रांगडा कांद्याला फरकाचे अनुदान मिळावे.

- कांदा निर्यातीस तातडीने चालना मिळावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com