Onion Rate : कांदा करणार सरकारचा 'वांदा'; गळ्यात कांद्याच्या माळा घालून विरोधकांचं आंदोलन

Team Agrowon

कांद्याचे दर कोसळल्याने राज्यभरातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

Onion Rate | Agrowon

याचेच पडसाद आज विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटताना दिसले.

Onion Rate | Agrowon

विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कांद्याच्या दरावरून सभागृहाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली.

Onion Rate | Agrowon

गळ्यात कांद्याच्या माळा घालून आणि डोक्यावर कांद्याच्या टोपल्या घेऊन विरोधी पक्षांचे आमदार सरकार विरोधात घोषणा दिल्या.

Onion Rate | Agrowon

कांदा उत्पादकांना सरकारने थेट मदत करून कांद्याची सरकारी खरेदी तातडीने सुरू करण्याची मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली.

Onion Rate | Agrowon

कांद्याबरोबरच कापूस, द्राक्ष आणि इतर शेतमालाचे भाव पडले असून दर वाढण्यासाठी सरकारने तात्काळ उपाय करण्याची मागणीही करण्यात आली.

Onion Rate | Agrowon

या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे आणि इतर आमदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Onion Rate | Agrowon
Onion Rate | Agrowon