Maharashtra Agriculture Drought Update: राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांचा तसेच विभागीय आयुक्तांचा अहवाल घेतला जाईल. कृषी, मदत व पुनर्वसन विभागाकडूनही स्वतंत्रपणे परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. या सर्व अहवालांच्या आधारे मंत्रिमंडळात चर्चा करून शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली..महसूलमंत्री बावनकुळे यांनी शनिवारी (ता. १९) तिवसा भागातील दुष्काळ परिस्थितीची पाहणी केली. या वेळी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. बावनकुळे म्हणाले, ‘‘मंत्र्यांनी आपापल्या भागातील परिस्थितीचा प्रत्यक्ष दौरा करून राज्यातील वास्तव सरकारसमोर मांडणे आवश्यक आहे. त्यानंतर मंत्रिमंडळात चर्चा होऊन निर्णय घेतले जातात. त्यामुळे मंत्र्यांच्या दौऱ्यांदरम्यान काजू-बदाम ठेवण्यात आल्याच्या मुद्द्यावरून सरकारच्या संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही..Rohit Pawar Demands Drought Declaration: शेतीसमोर संकट अधिक गडद? तत्काळ दुष्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, १० मुद्दे केले उपस्थित.यापूर्वी अमरावती जिल्ह्यात यापूर्वी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे ११५० कोटी रुपयांची मदत केली होती. त्या वेळीही जिल्हा ‘ट्रिगर’मध्ये नव्हता. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीतही केवळ ट्रिगरच्या निकषावर मदत थांबणार नाही. नुकसान प्रत्यक्ष किती झाले आहे, हे महत्त्वाचे आहे,’’ असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले..यंदाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, पीकनिहाय मदत, कापूस उत्पादकांसाठी उपाययोजना, नैसर्गिक आपत्तीतील सवलती, वीजबिलात सवलत आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंदर्भातील सवलती अशा विविध बाबींचा विचार सरकार करणार आहे. केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठविला जाईल; मात्र केंद्राच्या मदतीची वाट पाहत राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय लांबवणार नाही, असेही त्यांनी सांगितले..Maharashtra Drought: राज्यात दुष्काळ परिस्थिती गंभीर, केंद्राला मदतीचा प्रस्ताव पाठवावा लागेल- चंद्रशेखर बावनकुळे.नुकसान पंचनाम्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. उपग्रह प्रतिमा, ई-पीकपाहणी आणि पीक पेरणीची नोंद यांसारखी माहिती प्रशासनाकडे उपलब्ध आहे. त्यामुळे प्रत्यक्ष बांधावर झालेले नुकसान आणि उपलब्ध नोंदी यांची पडताळणी करून अचूक पंचनामे करता येणार आहेत. कुणाची फसवणूक होऊ नये आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्याला मदतीपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी या माहितीचा उपयोग केला जाईल..अमरावती जिल्ह्यातील काही तालुके सध्या पहिल्या ‘ट्रिगर’मध्ये आले आहेत. मात्र एखादा गंभीर नुकसानग्रस्त भाग निकषांमध्ये राहून गेला तरी त्यात दुरुस्ती करण्याचा अधिकार सरकारकडे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील आणि नुकसानग्रस्तांना मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले..तुरीची स्थिती समाधानकारकपावसाने सलग ३९ दिवसांचा खंड दिल्यामुळे सोयाबीन आणि दुसऱ्या टप्प्यात कापसाचे पीक प्रभावित झाले आहे. सध्या तुरीचे पीक धोक्याबाहेर असले तरी पावसाचा खंड वाढल्यास तुरीचे पीक देखील हाताबाहेर जाईल, अशी स्थिती निर्माण होण्याची भीती बावनकुळे यांनी व्यक्त केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.