New Fee structure for Agriculture Students: राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमधील पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच आचार्य पदवी अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क वाढण्याची शक्यता आहे. शासनाने नव्या शुल्क रचनेला मान्यता दिल्यास कृषी पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात तब्बल ५४ टक्के वाढ होणार आहे..शुल्कवाढीचा प्रस्ताव मंजूर होताच त्याची अंमलबजावणी २०२६-२७ शैक्षणिक वर्षापासून तत्काळ करण्याच्या तयारीत विद्यापीठे आहेत. ‘‘कृषी विद्यापीठांमधील अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क २०१३ पासून वाढविण्यात आलेले नाही..मात्र शैक्षणिक सुविधा खर्चात मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे शुल्कवाढ क्रमप्राप्त ठरते. नवी शुल्क रचना स्वीकारल्यास महसूल वाढेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाऱ्या शैक्षणिक सेवासुविधांमधील आर्थिक अडचणी दूर होतील,’’ असे विद्यापीठांचे म्हणणे आहे..Maharashtra Cooperative Education: विद्यापीठांत सहकार शिक्षण सुरू करणार: चंद्रकांत पाटील .सर्वच कृषी विद्यापीठांच्या विद्या परिषदा तसेच कार्यकारी परिषदांनी शुल्क वाढीच्या शिफारशी केलेल्या आहेत. तसेच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने देखील शिफारशींवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे शुल्कवाढीचा प्रस्ताव शासनाकडे अंतिम मंजुरीला पाठविण्यात आला आहे..Digital Education: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक जगासाठी सक्षम करण्यावर भर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस .कृषी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांकडून सेवासुविधा पुरवण्याच्या मोबदल्यात सध्या २० पेक्षा अधिक प्रकारचे शुल्क वसूल केले जाते. यात सर्वांत जास्त रक्कम शिक्षण शुल्काची असते. याशिवाय नोंदणी शुल्क, पात्रता शुल्क, महाविद्यालय हमी शुल्क, ग्रंथालय शुल्क, विद्यार्थी परिषद कार्यक्रम वर्गणी, जिमखाना, विद्यार्थी सहकारी संस्था शुल्क, स्नेहसंमेलन, नियतकालिके, क्रीडा महोत्सव शुल्क, वैद्यकीय सेवा शुल्क, विद्यार्थी कल्याण निधी,.गुणपत्रिका शुल्क, परीक्षा शुल्क, विमा हप्ता, पोहणे शुल्क, कार्यप्रणाली शुल्क, आपत्ती व्यवस्थापन शुल्क, पदवीदान समारंभ शुल्क घेतले जाते. याशिवाय विद्यार्थ्यांना वसतिगृह हमी अनामत, देखभाल खर्च, विद्युत बिल, भोजनगृह अनामत द्यावी लागते. कृषी पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांकडून प्रबंध तपासणी शुल्क तसेच शैक्षणिक भेट शुल्कदेखील वसूल केले जाते..पदवीसाठी मोजावे लागेल ६५ हजार ८१० रुपये शुल्ककृषी विद्यापीठांकडून शुल्क वसुली दोन सत्रांत केली जाते. कृषी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला पहिल्या सत्रासाठी सर्वसाधारणपणे २७ हजार ४५० रुपये, तर दुसऱ्या सत्रात १५ हजार २०० रुपये असे एकूण ४२ हजार ६५० रुपये मोजावे लागतात. मात्र, शुल्कवाढीनंतर विद्यार्थ्यांना पहिल्या व दुसऱ्या सत्रासाठी अनुक्रमे ३६ हजार ४१० रुपये व २९ हजार ४०० रुपये शुल्क द्यावे लागेल. नव्या शुल्क रचनेत दोन्ही सत्रे मिळून एकूण ६५ हजार ८१० रुपये शुल्क असेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.