MahaDBT Error: ‘महाडीबीटी’ला तांत्रिक अडचणींचा खोडा

Farmer Portal Issue: खरीप हंगामाच्या तोंडावर 'महाडीबीटी' पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे अर्ज प्रक्रियेत अडथळे येत आहेत. शुल्क भरल्यानंतरही अर्ज सबमिट न होणे, दस्तऐवज अपलोड न होणे यामुळे आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
MahaDBT
MahaDBTAgrowon
Published on
Updated on

Washim News: खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांसाठी शासनाने उपलब्ध करून दिलेले ‘महाडीबीटी’ पोर्टल सध्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी बनले आहे. २०२५-२६ च्या खरीप हंगामासाठी विविध पिकांच्या बियाण्यांसाठी अर्ज करण्याची मुदत ३ जूनपर्यंत वाढवण्यात आली असली तरी ऑनलाइन अर्ज सादर करताना ‘एरर’ येत आहे.

शेतकरी फार्मर आयडी वापरून महा-ई-सेवा केंद्रांवरून अर्ज करीत आहेत. मात्र राज्यभरात अर्ज सबमिट करताना २३ रुपये ६० पैसे शुल्क भरल्यानंतर देखील अर्ज अपूर्ण राहत आहे. पैसे खात्यातून कपात होतात, परंतु अर्ज यशस्वीरीत्या सबमिट होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

MahaDBT
MahaDBT : ‘महाडीबीटी’वरील प्रलंबित अर्जांची होणार निवड

काही ठिकाणी या त्रुटीमुळे शेतकरी आणि ई-सेवा केंद्र चालकांमध्ये वाद निर्माण झाले आहेत. शेतकरी शुल्क भरण्यास नकार देत आहेत. कारण अर्ज सबमिट झालेला नसतो. दुसरीकडे ई-सेवा केंद्र चालकांचे पैसे कपात होऊन देखील अर्ज निष्फळ ठरत असल्याने ते देखील अडचणीत सापडले आहेत. तांत्रिक अडचणीमुळे अयशस्वी झालेले अर्ज वैध मानावेत आणि अर्ज मुदतीला आणखी वाढ द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

MahaDBT
MahaDBT: ‘महाडीबीटी’तील ४४ लाख प्रलंबित अर्ज वैध
पोर्टलवर कागदपत्रे अपलोड होत नाहीत. वेळेत ही प्रक्रिया झाली नसल्यास अर्ज रद्द होणार आहे. मात्र, शासनाला माझी विनंती आहे, की ‘महाडीबीटी’ पोर्टलवरील अडचणी तत्काळ सोडवाव्यात. तोवर ज्या लाभार्थींची निवड झाली असेल ती रद्द करू नये, कारण त्यास संबंधित कास्तकार जबाबदार नसून शासन जबाबदार आहे.
शालिनी श्रीकांत देशमुख, ता. हदगाव, जि. नांदेड
महाडीबीटी पोर्टलवर बी बियाण्यासाठी अर्ज करताना शुल्क भरल्यानंतर देखील अर्ज दाखल झालाच नाही. त्यामुळे आम्ही भरलेले पैसे वाया गेले. हे पोर्टल त्वरित दुरुस्त करून आम्ही भरलेले अर्ज ग्राह्य धरावेत.
दीपक निकस, शेतकरी, लोणी खुर्द
खरीप सोयाबीनसाठी अर्ज करताना पैसे भरल्यानंतर देखील अर्ज पूर्ण भरता आला नाही. यामुळे आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे.
राजेश गुलाब बोडखे, शेतकरी, लोणी बुद्रूक

या आहेत मागण्या :

- तांत्रिक अडचण दूर करून पोर्टल सुरळीत करावे.

- यापूर्वी अयशस्वी झालेले अर्ज वैध धरावे.

- अर्ज प्रक्रियेची मुदत पुन्हा वाढवावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com