Mahabeejotsav : समाज, कृषी क्षेत्राच्या समन्वयाने ‘महाबीजोत्सव’ व्हावा : शर्मा

Subhash Sharma : मानवी जगण्याचा आधार असणारे पाणी, हवा आणि माती हे घटक शुद्ध व शाश्वत ठेवण्यासाठी समाज आणि कृषीक्षेत्राच्या परस्पर समन्वयातून महाबीजोत्सव व्हावा.
Subhash Sharma
Subhash Sharma Agrowon

Nagpur News : मानवी जगण्याचा आधार असणारे पाणी, हवा आणि माती हे घटक शुद्ध व शाश्वत ठेवण्यासाठी समाज आणि कृषीक्षेत्राच्या परस्पर समन्वयातून महाबीजोत्सव व्हावा, अशी भावना प्रगतिशील शेतकरी सुभाष शर्मा यांनी शनिवारी (ता. २७) व्यक्त केली.

येथील वसंतराव नाईक कृषी विस्तार व्यवस्थापन शिक्षण संस्थेच्या (वनामती) स्व. वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित राष्ट्रीय बीज महोत्सवाच्या उद्‍घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात श्री. शर्मा यांनी हे विचार मांडले. वनामतीच्या संचालक मित्ताली सेठी, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) प्रकल्प संचालक डॉ. अर्चना कडू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे,

Subhash Sharma
Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

बीजोत्सव संकल्पनेचे जनक प्रगतिशील शेतकरी वसंत फुटाणे या वेळी मंचावर उपस्थित होते. देशात ठिकठिकाणी बीज महोत्सवाचे आयोजन होऊन सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास श्री. शर्मा यांनी व्यक्त केला. त्यांनी कृषी क्षेत्रासमोरील विविध आव्हानांबाबत विस्तृत माहिती दिली.

मिताली सेठी म्हणाल्या, की आपल्या आवतीभवती शेतीत वेग-वेगळे संशोधन, नव-नवे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांनी वनामती संस्थेसमोर आपल्या संकल्पना मांडाव्यात त्या जास्तीत-जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संस्था पुढाकार घेईल. कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी शेतीतील नवनवीन प्रयोग व संशोधनाला सर्वदूर पोहोचविणे, संशोधन व्यवस्थापन, जीआयएस, कृषी उत्पादक शेतकरी आदी घटकांना एकत्र आणून यास चळवळीचे स्वरुप देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

Subhash Sharma
Agriculture Department : कृषी खात्याला गती देण्यासाठी ‘गेडाम पॅटर्न’

रवींद्र मनोहरे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. अर्चना कडू यांनी प्रस्ताविक केले. बीज महोत्सव समूहाच्या समन्वयक कीर्ती मंगरुळकर यांनी सूत्रसंचालन केले. प्राची माहुरकर यांनी आभार मानले.

काय आहे बीज महोत्सव?

शेतकरी, स्वयंसेवी संस्था, संशोधक, सरकारी तसेच शैक्षणिक संस्था यांच्यात समन्वय वाढवून येणाऱ्या पिढ्यांसाठी व पर्यावरणाला अनुकूल सुरक्षित पोषक अन्न उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २७ ते २९ एप्रिल या कालावधीत राष्ट्रीय बीज महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यात परंपरागत बियाण्यांचे प्रदर्शन, सेंद्रिय व नैसर्गिक शेतीमाल प्रदर्शन व विक्री, भरडधान्य पाककृती कार्यशाळा आणि पर्यावरण संतुलन विषयावर चित्रकला स्पर्धा आदी उपक्रम होत आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, पश्चिम बंगाल, आंध्र पदेश, तमिळनाडू आदी १८ राज्यांतील बीज उत्पादक शेतकरी या महोत्सवात सहभागी झाले आहेत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com