Mahaagro App : कृषी उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘महाॲग्रो’ ॲप

Dhananjay Munde : राज्यात उत्पादित होणारी कृषी उत्पादने आणि शेतीमाल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने ‘महाॲग्रो ॲप’ची निर्मिती करण्यात आली आहे.
Mahaagro App
Mahaagro AppAgrowon

Mumbai News : राज्यात उत्पादित होणारी कृषी उत्पादने आणि शेतीमाल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने ‘महाॲग्रो ॲप’ची निर्मिती करण्यात आली आहे. या ॲपद्वारे खरेदी केलेली कृषी उत्पादने पोस्टाद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.

या ॲपचे अनावरण कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲपद्वारे खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र शासन व भारतीय पोस्ट यांच्या दरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षरीही करण्यात आली.

Mahaagro App
Agriculture Weather Report : अंदाज असावेत अधिक अचूक

अॅप अनावरणाच्या दिवशीच ३५८ उत्पादकांची १३७० उत्पादने या व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्याचबरोबर या ॲपवर राज्यातील शेतकऱ्यांना हवामान खात्याची माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळामार्फत विविध प्रकारच्या कृषी मालाचे दैनंदिन भाव सुद्धा भविष्यात या पोर्टलवर दिसतील.

Mahaagro App
Agriculture Commodity Market : शेतीमाल व्यापारासाठी बीएसई ई-अॅग्रिकल्चरल मार्केट्स लिमिटेड

श्री. मुंडे म्हणाले, ‘‘देशात मोबाईल इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट क्रांती झालेली आहे. त्याचा सर्वाधिक फायदा ई-कॉमर्स क्षेत्राला झाला आहे. भविष्यात देशातील ई-कॉमर्स क्षेत्र २५० अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. याचा फायदा कृषिक्षेत्राला मिळावा, यासाठी शासनाचे असे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स मोबाईल ॲप व वेब प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न होता.

शेतकरी, बचत गट, स्वयं सहाय्यता गट, स्टार्टअप, लहान मोठे व्यावसायिक व शेतकरी उत्पादक कंपन्यांची शेती उत्पादने, शेतीशी निगडीत उत्पादनांची ऑनलाइन विक्री या ॲपद्वारे होईल. या ॲपद्वारे खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम पोस्ट खाते व फर्स्ट अँड फास्ट लॉजिस्टिक करेल.’’

अपर मुख्य सचिव अनुप कुमार, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले, महाव्यवस्थापक सुजित पाटील, सुनील पाटील, पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग, जनरल के सोमसुंदरम, मुंबई पोस्ट विभागाचे अजिंक्य काळे, श्रद्धा गोकर्ण आदी उपस्थित होते.

...असे करा ॲप डाऊनलोड

प्ले स्टोअरमध्ये हे ॲप महाॲग्रोमार्ट या नावाने उपलब्ध आहे. हे ॲप डाऊनलोड (लिंक -https://play.google.com/store/apps/details0id=com.maidc.mart ) करून फ्लिपकार्ट, ॲमेझॉनप्रमाणेच १३७० उत्पादने खरेदी करता येऊ शकतात. या ॲपवर ऑनलाइन पेमेंट सुद्धा करता येऊ शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com