Mango Farm Management
Mango Farm ManagementAgrowon

Maha kesar Mango : ‘महा केसर’ आंबा ब्रँड तयार करणार

अजिंठा जवळील संघाचे संचालक अशोक सूर्यवंशी यांच्या आधुनिक बागेमध्ये तसेच पाथरी येथील एग्रीकल्चर कॉलेजमध्ये केसर आंबा मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे.

Aurngabad Mango News : महाकेसर आंबा बागायतदार संघाच्या माध्यमातून औरंगाबाद येथे भव्य आंबा महोत्सवाचे (Mango Festival) आयोजन करण्यात येईल. त्यासाठी मुख्यमंत्री यांना महोत्सवाच्या उद्घाटनाचे निमंत्रण देण्यात येणार आहे.

महा केसर आंबा (Kesar Mango) ब्रँड तयार करण्यात येईल. त्यासाठी विशेष दीड डझन आंबा पॅकिंग बॉक्स तयार करण्याचा निर्णय औरंगाबाद येथे महा केसर आंबा बागायतदार संघ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती संघाचे तज्ञ संचालक डॉ. भगवानराव कापसे यांनी दिली.

अजिंठा जवळील संघाचे संचालक अशोक सूर्यवंशी यांच्या आधुनिक बागेमध्ये तसेच पाथरी येथील एग्रीकल्चर कॉलेजमध्ये केसर आंबा मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ येथे खास भेट देऊन आंबा मार्केटिंग विषयीच्या नियोजन विषयी चर्चा करण्यात आली. संघाचे अध्यक्ष नंदूअण्णा काळे यांची महानंद डेअरीवर बिनविरोध निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.

Mango Farm Management
Shindhudurg Fire : इन्सुलीत आंबा, काजूची झाडे खाक

पुणे येथे गुलटेकडी भागात आंबा विक्री व्यवस्था नियोजन करणे, औरंगाबाद येथील मोठ्या सोसायट्यात नेटवर्क तयार करणे., भारतीय रेल्वे विभाग नांदेड यांना विनंती करून रेल्वे स्टेशनवर विक्रीसाठी व्यवस्था करणे, संघाच्या कार्यालयासाठी जागा पाहणी व निवड करणे, पत्र व्यवहार करणे.

आदी विषयावर चर्चा करून आंब्याला चांगला दर मिळण्यासाठी, शेतकऱ्याच्या फायद्यासाठी निर्णय घेण्यात आले. बैठकीत संघाचे अध्यक्ष नंदू अण्णा काळे, डॉ भगवानराव कापसे, पंडित लोणारे, शिवाजी उगले, विश्वनाथ दहे, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, बापूसाहेब भोसले, त्र्यंबक पाथ्रीकर, प्रकाश कापसे आदी संचालकांनी भाग घेतला.

बैठकीतील निर्णय...

१) मार्केटिंगसाठी दिल्ली, जयपूर, लुधियाना इत्यादी संचालक मंडळ दौरा करणार.

२) जालना येथील बाजार समितीमधील निर्यात सुविधांची पाहणी करणार.

३) शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. कापसे याच्या नेतृत्वात बीड, बार्शी, पंढरपूर, सांगोला, तासगाव, सांगली दौरा संचालक मंडळ करणार.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com