Shindhudurg Fire : इन्सुलीत आंबा, काजूची झाडे खाक

इन्सुली गावकरवाडी येथे प्रमोद केरकर यांची बाग आहे. यामध्ये उत्पादनक्षम आंबा, काजूची शेकडो झाडे आहेत.
Forest Fire
Forest Fire Agrowon
Published on
Updated on

Shindhudurg News : जिल्ह्यातील इन्सुली (ता. सावंतवाडी) गावकरवाडी येथे लागलेल्या आगीत आंबा, काजूसह सागवान आणि कोकमची शेकडो झाडे जळाली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यात शेतकऱ्यांचे सुमारे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले.

Forest Fire
Cashew Processing : काजू प्रक्रिया धारक आणि उत्पादकांचे कर्ज पुनर्गठन करू

इन्सुली गावकरवाडी येथे प्रमोद केरकर यांची बाग आहे. यामध्ये उत्पादनक्षम आंबा, काजूची शेकडो झाडे आहेत. याशिवाय सागवान आणि कोकमचीदेखील झाडे आहेत. या बागेतून महावितरणची ३३ केव्ही वीजवाहिनी गेली आहे.

दरम्यान सोमवारी (ता. १३) दुपारी अडीचच्या सुमारास बागेत अचानक आग लागली. कडक ऊन आणि वाऱ्याच्या वेगामुळे आगीचा भडका उडाला.

आग लागल्याचे समजताच स्थानिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात आली नाही. या आगीत बागायतदार केरकर यांची शेकडो झाडे जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

जिल्ह्यातील कळणे (ता. दोडामार्ग) आडाळी येथील भिवा गावकर आणि मधुकर गावकर यांच्या बागेला आग लागली. आगीत त्यांची काजूची १०० हून अधिक झाडे जळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com