MahaAgro Mart : शेतीमाल ऑनलाइन विक्रीसाठी ‘महाॲग्रो मार्ट’

Agriculture Produce Market : शेतकऱ्यांना पिकवलेला शेतीमाल विक्री करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon

Satara News : शेतकऱ्यांना त्यांचा प्रक्रिया केलेला शेतमाल ऑनलाइन पद्धतीने विक्री करता यावा. यासाठी महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून अॅमेझॅान, फ्लिपकार्टच्या धर्तीवर महाअॅग्रो नावाचे ऑनलाइन मार्केटिंग अॅप विकसित करण्यात आले आहे.

या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना नवी बाजारपेठ मिळणार असून, थेट ग्राहकांना तयार केलेल्या डाळी, प्रक्रिया केलेले उत्पादने विक्री करता येणार आहेत. यातून शेतमाल व चांगला दर मिळण्यास मदत होणार आहे.

शेतकऱ्यांना पिकवलेला शेतीमाल विक्री करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विक्रीची कला आणि वेळ नसल्याने दर्जेदार शेतीमाल असतानाही शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा होत नाही. याउलट व्यापाऱ्यांकडून विक्री कौशल्य आणि भांडवलाच्या जोरावर अधिक फायदा कमवला जात आहे.

Agriculture Market
Climatic Advice for Agriculture : ‘सल्ला’च टिकवणार शेती

ही समस्या ओळखून महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून ‘महाअॅग्रो मार्ट’ या नावाचे ऑनलाइन मार्केटिंग अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित उत्पादने किंवा कृषी निविष्ठासुद्धा खरेदी करता येणार आहेत. यामुळे शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गट, व्यावसायिक किंवा उत्पादक यांना फायदा होणार असून शेतमाल थेट ऑनलाइन पद्धतीने विक्री किंवा खरेदी करता येणार आहे.

या ॲपमध्ये खते, अवजारे डीलर्स यांना सहभागी होता येणार असून, यासाठी महामंडळाकडे अर्ज करावा लागणार आहे. हे ॲप उत्पादक आणि शेतकऱ्यांना या उपयुक्त ठरणार आहे. ॲपसाठी नोंदणीचे काम सुरू झालेले असून १५ डिसेंबर रोजी हे ॲप सुरू करण्यात आले असून, प्रत्यक्ष खरेदी विक्री २६ जानेवारीपासून होणार आहे.

या लिंकवरून करा डाउनलोड

या अॅपसाठी https://play.google.com/store/apps/details?id=com.maidc.mart या लिंकचा वापर करावा. तसेच अधिक माहितीसाठी किशोर राठोड प्रभारी व्यवस्थापक (ई-कॉमर्स) ८८८८८४२२९०, अमरसिंह निंबाळकर ८८८८८४२३८६ या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रभारी अधिकारी अमरसिंह निंबाळकर यांनी केले आहे.

Agriculture Market
Agricultural Commodity Export : या शेतमालाचे निर्यातीचे निकष झाले अजून कडक

यांना घेता येईल सहभाग

- शेतकरी उत्पादक कंपनी.

- शेतकरी उत्पादक संस्था.

- महिला बचत गट.

- व्यावसायिक, उत्पादक.

...अशी आहेत अॅपची वैशिष्ट्ये

- अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या बाजारपेठेचा हिस्सा बनण्याची संधी.

- गुणवत्ता आणि सुरक्षिततेची हमी.

- कार्यक्षम विपणन व्यवस्था सुलभ व तत्काळ नोंदणी.

- स्वतःच्या शेतमाल स्वतःच्या ब्रॅण्डने विकता येणार.

- शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूची अॅपवरून खरेदी करता येणार.

- पोस्टाच्या साह्याने घरपोच वस्तू दिल्या जाणार.

शेतीत नव्याने येत असलेल्या शेतकरी हा तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत. या शेतकऱ्यांना पुढे ठेऊन या ‘महाॲग्रो मार्ट’ ॲपची निर्मिती केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी खते, कीटकनाशके, अवजारे मिळणार आहेत. त्याबरोबर शेतकऱ्यांनी तयार केलेला शेतीमाल ब्रॅडिंग, प्रतवारी, पॅकिंग करून विकता येणार आहे. पुढील काळात यामध्ये विविध योजना वेअर हाऊस, शीतगृह यांची उपलब्धतेची माहिती दिली जाणार आहे.
- डॉ. मंगेश गोंदवले, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com