MAGNET : ‘एफपीओ’च्या क्षमता बांधणीवर ‘मॅग्नेट’चा भर

Latest Agriculture News : राज्य शासनाचा कृषी व पणन विभाग आणि आशियायी विकास बँक यांच्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या मॅग्नेट (महाराष्ट्र ॲग्रिबिझनेस नेटवर्क प्रोजेक्ट) प्रकल्पामध्ये फलोत्पादन क्षेत्रातील संस्थांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
MAGNET
MAGNETAgrowon
Published on
Updated on

Nashik News : राज्य शासनाचा कृषी व पणन विभाग आणि आशियायी विकास बँक यांच्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या मॅग्नेट (महाराष्ट्र ॲग्रिबिझनेस नेटवर्क प्रोजेक्ट) प्रकल्पामध्ये फलोत्पादन क्षेत्रातील संस्थांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

यात पायाभूत सुविधांचा विकास, प्रक्रिया उद्योगांची स्थापना यांचा समावेश आहे. याचाच भाग म्हणून नुकतेच ‘सह्याद्री फार्म्स’ येथे शेतकरी उत्पादक कंपनीच्या एकूण ४०९ संचालकांना क्षमता बांधणीचे व काढणी पश्‍चात तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले.

प्रकल्पांतर्गत राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी व मूल्य साखळी गुंतवणूकदारांसाठी काढणीपश्‍चात व्यवस्थापन तंत्रज्ञान प्रशिक्षण दिले जात आहे. यात डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, सीताफळ, चिकू, पेरू, स्ट्रॉबेरी, भेंडी, मिरची (लाल व हिरवी), फुले, पडवळ, काजू, आंबा व लिंबू या १५ फळपिकांचा समावेश आहे.

MAGNET
MAGNET Project : ‘मॅग्नेट’साठी १३६ कोटी वितरणास मान्यता

सह्याद्री रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन हे ‘मॅग्नेट’ प्रकल्पासाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून कार्यरत आहे. प्रकल्प संचालक विनायक कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पामध्ये महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्रातील शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक आणि भागधारकांसाठी दोन महत्त्वपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

क्षमता बांधणी हा कार्यक्रम शेतकरी उत्पादक संचालकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यावर भर देतो. यामध्ये शेतकरी उत्पादकचे आर्थिक व्यवस्थापन, विपणन रणनीती, बाजारपेठेची उपलब्धता सुलभ करणे आणि शेतकरी उत्पादकच्या विकासासाठी आवश्‍यक असलेल्या इतर महत्त्वपूर्ण बाबींवर मार्गदर्शन केले जात आहे.

MAGNET
MAGNET Project : मॅग्नेट सारख्या प्रकल्पात येणाऱ्या अडचणी सोडवणार ः अब्दुल सत्तार

काढणीपश्‍चात व्यवस्थापन तंत्रज्ञान हा कार्यक्रम पीक काढणीनंतर होणाऱ्या नुकसानीचा धोका कमी करण्यासाठी, प्रक्रिया उद्योगांची स्थापना, बाजारपेठेशी लिंक स्थापित करणे आणि निर्यातीच्या संधीवर प्रशिक्षण देतो. प्रशिक्षणामुळे शेतकरी उत्पादक कंपनीच्याच्या संचालकांमध्ये नेतृत्वगुण आणि व्यवस्थापन कौशल्ये विकसित होत आहेत.

शेतकरी उत्पादक कंपनीला आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करण्यास मदत होते आहे, ज्यामुळे राज्यातील फलोत्पादनात वाढ होईल, असे सह्याद्री फार्म्सच्या एच-स्क्वेअर इन्क्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद राजेभोसले यांनी सांगितले.

पीक काढणीपश्‍चात व्यवस्थापन आणि प्रक्रिया उद्योगाला चालना मिळावी. गुणवत्तापूर्ण प्रक्रिया उद्योग उभे राहावे व या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांची मूल्यसाखळी निर्माण व्हावी याकरिता आम्ही शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहोत. -एस. वाय. पुरी,
विभागीय प्रकल्प उपसंचालक, मॅग्नेट
या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्हाला शिकण्याची संधी तर मिळालीच, मात्र याचबरोबर प्रक्रियेदरम्यान होणाऱ्या चुका टाळता येतील आणि जास्तीत जास्त उत्पन्न निश्‍चित करता येणार आहे.
-सायली देशमुख, प्रशिक्षणार्थी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com