Magnet Project: ‘मॅग्नेट’चे तोतयागिरीला बळी न पडण्याचे आवाहन

Fraud Alert: महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पातील गुंतवणूक आणि परताव्याच्या भूलथापांना आणि तोतयागिरीला बळी पडू नका, असे आवाहन प्रकल्प संचालकांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
Magnet Project
Magnet ProjectAgrowon
Published on
Updated on

Pune News: शेतीमालाच्या काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाद्वारे मूल्यवर्धनासाठी आशियायी विकास बॅंकेच्या सुमारे १ हजार १०० कोटींच्या निधीद्वारे सुरू असलेला महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पातील गुंतवणूक आणि परताव्याच्या भूलथापांना आणि तोतयागिरीला बळी पडू नका, असे आवाहन प्रकल्प संचालकांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Magnet Project
Magnet Project : मॅग्नेट प्रकल्पासाठी १०४ कोटी रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता

‘मॅग्नेट’ प्रकल्पामध्ये गुंतवणूक करून, अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून महाराष्‍ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचा सभापती प्रवीणकुमार ऊर्फ बाळासाहेब नाहाटा याने काही गुंतवणूकदारांची सुमारे अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘मॅग्नेट’ प्रकल्प संचालकांनी प्रसिद्धिपत्रक जारी करून नाहाटा याचे कान टोचले आहेत.

Magnet Project
Magnet Projects : ‘मॅग्नेट’अंतर्गत राज्यात ११०० कोटींचे प्रकल्प

प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की मॅग्नेट प्रकल्प हा शेतीमालाच्या काढणीपश्‍चात नुकसान कमी करण्यासाठी विविध तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मूल्यवर्धनाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प कोणत्याही वैयक्तिक लाभाचा आणि व्याज परतावा न देणारा प्रकल्प असून,

शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना सामूहिक अनुदान देणारा प्रकल्प आहे. यामुळे या प्रकल्पामध्ये गुंतवणूक करून व्याज अथवा, परतावा देण्याबाबतची कुठल्याही योजनेची तरतूद नाही. तरी अशा प्रकारच्या भूलथापांना व तोतयागिरीला कोणीही बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com