Aarogya Bharati : आरोग्य भरतीला थंड प्रतिसाद

Contract Recruitment : अपुरे मनुष्यबळ भरून काढण्यासाठी सहा महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने विविध २९३ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे;
Health Department Recruitment
Health Department RecruitmentAgrowon

Thane News : महापलिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडलेल्या मृत्यू तांडवानंतर, ठाणे पालिका प्रशासन आरोग्य सेवेच्या बळकटीकणावर भर देत आहे. त्यात अपुरे मनुष्यबळ भरून काढण्यासाठी सहा महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने विविध २९३ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे;

मात्र या भरती प्रक्रियेला इच्छुकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पालिका प्रशासनाने भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. या वेळेस प्रतिसाद मिळतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ठाणे शहराचे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात नागरिकरण होत आहे. त्यामुळे लोकसंख्येतदेखील वाढ होत आहे. त्याचा ताण मुलभूत सुविधांवर पडू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्याच्या घडीला पालिका क्षेत्राची लोकसंख्या २५ लाखांच्या पुढे गेली आहे; मात्र, त्या तुलनेत असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे ठाणेकरांना सेवा पुरविण्यात पालिका प्रशासन कमी पडत असून ताण वाढत आहे.

Health Department Recruitment
Maratha reservation : शेतकरी आंदोलन आणि मराठा आरक्षणावरून शरद पवार, संजय राऊत आणि नाना पटोले यांचा सरकारवर घणाघात

अशातच आकृतीबंधमधील ८८० वाढीव पद भरतीला राज्य शासनाने मंजुरी दिली. मात्र, बिंदूनामावलीचे काम पूर्ण न झाल्यामुळे भरती प्रक्रिया सुरू होऊ शकलेली नाही. त्याचा फटका पालिकेच्या आरोग्य सेवेला बसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १२५ शिकाऊ आणि सुमारे १५० तज्ज्ञ डॉक्टर आहेत.

Health Department Recruitment
MPBCDC : मागासवर्गीय महामंडळांना केंद्राचा ३०५ कोटींचा निधी

रुग्णालयात २१० परिचारिकांची पदे मंजुर आहेत. त्यातील १८० पदे भरली गेली आहेत. रुग्णांच्या तुलनेत परिचारिकांची संख्या कमी आहे. भरतीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पालिका रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय होण्याची भिती लक्षात घेऊन मंजूर पदांवर सहा महिन्यांकरीता कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय प्रशासनाने काही वर्षांपूर्वी घेतला. यानुसार राबविण्यात येत असलेल्या भरती प्रक्रियेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

Health Department Recruitment
MPBCDC : मागासवर्गीय महामंडळांना केंद्राचा ३०५ कोटींचा निधी

या पदांसाठी भरती

२० स्त्रीरोग तज्ज्ञ, चार बालरोग तज्ज्ञ , चार शल्यचिकित्सक, चार फिजीशियन, चार भूलतज्ज्ञ, चार नेत्र शल्यचिकित्सक, १२ वैद्यकिय अधिकारी, १०० परिचारिका, १०० प्रसाविका, एक बायोमेडिकल अभियंता, एक ‌फिजीयोथेरापिस्ट, एक डायटेशियन, एक ऑक्युपेशनल थेरपिस्ट, दोन स्पिच थेरपिस्ट, एक पब्लिक हेल्थ नर्स, तीन मेडिकल रेकाॅर्ड किपर,

दोन सायकॅट्रिक कौन्सिलर, तीन वैद्यकीय समाजसेवक, दोन सायकॅट्रीक सोशल वर्कर, दोन ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर, आठ औषध निर्माण अधिकारी (मिश्रक), एक दंत हायजिनिस्ट, तीन सीएसएसडी सहायक, दोन इलेक्ट्रीशियन, एक डेप्युटी लायब्रेरियन (उपग्रंथपाल), एक लायब्ररी असिस्टंट , दोन क्युरेटर ऑफ मुझियम, दोन आरोग्य निरिक्षक, एक आर्टिस्ट व एक फोटोग्राफर या पदांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com