Agricultural Technology Development: कृषी अभियंत्यांच्या ३८व्या राष्ट्रीय अधिवेशनात देशभरातून सुमारे १०० संशोधन पेपर सादर करण्यात आले. विविध तांत्रिक सत्रांमध्ये झालेल्या चर्चेतून शेतकऱ्यांसाठी कमी खर्चातील तंत्रज्ञान विकसित करण्यासह सात प्रमुख शिफारशी पुढे आल्या. या शिफारशींचा संकलित अहवाल ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया)’कडे पाठविण्यात येणार आहे. तसेच व्यवहार्य संशोधन प्रकल्पांचे स्टार्टअपमध्ये रूपांतर करण्यासाठी मार्गदर्शन आणि कमी खर्चातील तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहेत..‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), महाराष्ट्र राज्य केंद्र’ आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या अधिवेशनाचा शुक्रवारी (ता. २८) समारोप झाला..Agricultural Technology: ट्रॅक्टर उद्योगाला भारतीय बाजारपेठेत मोठी संधी.समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. निलेश पाटील होते. या वेळी ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), महाराष्ट्र राज्य केंद्राचे अध्यक्ष इंजी. विजय कांबळे, कृषी अभियांत्रिकी विभाग मंडळाचे अध्यक्ष प्रा. (डॉ.) एम. नेमिचंद्रप्पा, अधिवेशनाचे संयोजक डॉ. दीपक बोरणारे, महाराष्ट्र राज्य केंद्राचे मानद सचिव इंजी. वसंत पांढरकर तसेच अभियंता मिलिंद पाटील उपस्थित होते..Ai in Agriculture: कृषी विज्ञान केंद्रात ‘एआय’ आधारित कृषी प्रणालीचा प्रारंभ.कांबळे यांनी स्वागतपर भाषणात कृषी क्षेत्रातील आव्हानांवर प्रभावी उपाय शोधण्यासाठी अभियांत्रिकी संशोधन आणि शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष गरजा यांची सांगड घालणे आवश्यक असल्याचे सांगितले. डॉ. पाटील यांनी कृषी क्षेत्र अधिक शाश्वत, उत्पादनक्षम आणि हवामान बदलास सक्षम बनविण्यासाठी आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद केले..अधिवेशनात सादर झालेल्या संशोधनातून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष उपयोगी पडणारी साधने, उत्पादने आणि सेवा विकसित व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रा. डॉ. नेमिचंद्रप्पा यांनी विविध तांत्रिक सत्रांतून पुढे आलेल्या शिफारशी सादर केल्या..पुढे आलेल्या शिफारशीशेतकऱ्यांसाठी कमी खर्चातील आणि सहज वापरता येणारे तंत्रज्ञान विकसित करणे.कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, आयओटी आणि अचूक शेती तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष शेतीतील वापर वाढविणे.हवामान बदलास अनुकूल जल व्यवस्थापन, मृदा आरोग्य संवर्धन आणि शाश्वत शेतीवर भर देणे.उपयुक्त संशोधनाचे पेटंट, स्टार्टअप आणि व्यावसायिक उत्पादनांमध्ये रूपांतर करणे.संशोधन संस्था, अभियांत्रिकी महाविद्यालये, उद्योग आणि शेतकरी यांच्यात समन्वय वाढविणे.निवडक तंत्रज्ञानाची प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिके आणि शेतकरी प्रशिक्षण आयोजित करणे.दर्जेदार संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट संशोधन पेपरचा गौरव करणे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.