MHADA Department : ‘म्हाडा’कडून ९४१ सदनिकांसाठी सोडत जाहीर

MHADA Lottery Update : नूतन संगणकीय प्रणाली व ॲपच्या साहाय्याने सदनिकांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेस बुधवारी दुपारी १२ वाजेपासून सुरुवात झाली.
Mhada Department
Mhada DepartmentAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : ‘म्हाडा’चा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर, गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अखत्यारीतील छत्रपती संभाजी नगर शहर व जिल्हा, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी आणि धाराशिव येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ९४१ सदनिका व ३६१ भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाइन संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा ‘गो लाइव्ह’ कार्यक्रमाचा प्रारंभ बुधवारी (ता. २८) म्हाडा विभागीय कार्यालयात झाला.

एकात्मिक गृहनिर्माण सोडत व्यवस्थापण प्रणाली (IHLMS २.०) या नूतन संगणकीय प्रणाली व ॲपच्या साहाय्याने सदनिकांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेस बुधवारी दुपारी १२ वाजेपासून सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगर मंडळ विभाग म्हाडाचे मुख्याधिकारी मंदार वैद्य यांच्या हस्ते त्याची सुरुवात करण्यात आली.

Mhada Department
Potato Crop : बटाटा पिकाबरोबर इतर पिकेही घेण्यावर भर द्यावा

या वेळी निवृत्त न्यायाधीश शेटे, उपायुक्त डॉ. अनंत गव्हाणे, जिल्हा सूचना अधिकारी एनआयसीचे श्री. थोरात, उपमुख्याधिकारी जयकुमार नामेवार, बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्य व्यवस्थापक गुरूप्रित कौर कांबो, संगिता बाहुरे, मिळकत व्यवस्थापक वैशाली भोजने, विधी सहायक, नीतीन शिंदे, मुख्य अभियंता,यांच्यासह म्हाडा कार्यातील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

ॲपच्या माध्यमातून तसेच अर्जदारांच्या सोयीकरिता https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, ध्वनीचित्रफिती, हेल्प फाइल आणि हेल्प साइट या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे, असे आवाहन मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. वैद्य यांनी केले.

Mhada Department
Maharashtra Politics : मुख्यमंत्र्यांची बनावट सही, शिक्का प्रकरण; सत्ताधारी, विरोधक आमनेसामने

म्हाडाच्या राज्यातील विविध मंडळांमार्फत जाहीर होणाऱ्या सोडतींमध्ये सहभाग घेण्यासाठी संगणकीय प्रणाली अंतर्गत अर्ज नोंदणी प्रक्रिया मंडळाने जाहीर केलेल्या सदनिका विक्री सोडतीची लिंक २७ मार्च २०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत कार्यरत असणार आहे. त्यानंतर सोडतीत सहभाग घेण्याची लिंक या प्रणालीवरून निष्क्रिय करण्यात येणार आहे. तोपर्यंत अर्जदार अनामत रक्कमेचा भरणा ऑनलाइन करू शकतील.

२८ मार्च रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आरटीजीएस/एनईएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदाराच या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील. सोडतीसाठी पात्र अर्जांची प्रारूप यादी ४ एप्रिल दुपारी ३ वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीवर अर्जदारांना ७ एप्रिल रोजी दुपारी ३ पर्यंत ऑनलाइन हरकती नोंदविता येणार आहे. १२ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ३ वाजता अंतिम पात्र अर्जाची यादी जाहीर केली जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com