Lokayukta Notice : मंत्री दादा भुसे यांना लोकायुक्तांची नोटीस

Malpractices in Agriculture Department Transfers : कृषी खात्यात झालेल्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार लोकायुक्तांकडे वर्ग झाल्यानंतर आता या प्रकरणाला रंगतदार वळण मिळाले आहे.
Notice of Lokayukta
Notice of Lokayukta Agrowon

Pune News : कृषी खात्यात झालेल्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार लोकायुक्तांकडे वर्ग झाल्यानंतर आता या प्रकरणाला रंगतदार वळण मिळाले आहे. लोकायुक्तांनी थेट तत्कालीन कृषिमंत्री म्हणून दादा भुसे यांना नोटीस बजावली आहे.

Notice of Lokayukta
Agriculture Department : कोतवालाच्या कुटुंबीयांना कृषी विभागाकडून आर्थिक मदत

गैरव्यवहाराबाबत महायुतीच्या सरकारमधील मंत्र्याला लोकायुक्तांकडून नोटीस बजावली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. श्री. भुसे सध्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत. काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी कृषी खात्यातील गैरव्यवहाराशी संबंधित २२ फाइल्स उपलोकायुक्तांसमोर नेल्या होत्या. बदल्या, पदोन्नत्या, तसेच गुणनियंत्रणाशी संबंधित गैरप्रकारांचा समावेश यात होता. श्री. भुसे यांनी बदल्यांचे अधिनियम, नागरी सेवा मंडळाच्या शिफारशी डावलून बदल्या केल्या आहेत.

मर्जीतील अधिकाऱ्याला सहसंचालकाची पदोन्नती देण्यासाठी पदोन्नतीचे प्रस्तावदेखील मुद्दाम रखडवले होते, असा आरोप या तक्रारींमध्ये आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या तक्रारीची सुनावणी आधी उपलोकायुक्त संजय कुमार भाटिया यांच्याकडे सुरू होती. परंतु, तक्रारींमधील संदर्भ मंत्र्यांकडे जाऊ लागले.

त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले. त्यानंतर ही तक्रार उपलोकायुक्तांकडून न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांच्याकडे वर्ग झाली. या प्रकरणाची नव्याने सुनावणी घेत न्या. कानडे यांनी तक्रारदार वसंत मुंडे व कृषी विभागाच्या उपसचिव प्रतिमा पाटील यांचे म्हणणे ऐकून घेतले.

Notice of Lokayukta
Agriculture Department : बदल्यांच्या कथित घोटाळ्याची लोकायुक्त घेणार सुनावणी

भुसेंना सहा आठवड्यांची मुदत

भुसे यांना त्यांच्यावरील आरोपासंदर्भात उत्तर देण्यासाठी लोकायुक्तांनी सहा आठवड्यांची मुदत दिली आहे. ‘‘भुसे स्वतः किंवा वकिलामार्फत हजर होऊ शकतात. त्यांना या प्रकरणातील मूळ तक्रार, सादर करण्यात आलेले लेखी म्हणणे, कागदपत्रे, कृषी खात्याने सादर केलेला अहवाल असे सर्व दस्तावेज भुसे यांना देण्यात यावे,’’ असेही आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत.

पाच जुलै रोजी सुनावणी

‘‘या प्रकरणात कृषिमंत्री म्हणून दादाजी भुसे यांच्यावर बदल्या, पदोन्नत्यांशी निगडीत विविध आरोप करण्यात आले आहेत. आरोपांसोबत एक प्रतिज्ञापत्रदेखील सादर करण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूने राज्याच्या कृषी विभागाने एक सविस्तर अहवाल आमच्यासमोर ठेवला आहे. तक्रारीतील आरोप सत्य नसल्याचे या अहवालात कृषी खात्याने नमूद केले आहे.

नैसर्गिक न्यायानुसार या प्रकरणात कोणताही आदेश देण्यापूर्वी आम्हाला त्रयस्तांचे म्हणणे ऐकून घेणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळेच या प्रकरणातील त्रयस्त दादाजी भुसे यांना नोटीस बजावण्यात यावी,’’ असे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी येत्या पाच जुलै रोजी होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com