Financial Help
Financial HelpAgrowon

Agriculture Department : कोतवालाच्या कुटुंबीयांना कृषी विभागाकडून आर्थिक मदत

Financial Help : मृत्यू झालेला कोतवाल अत्यंत सामान्य कुटुंबातील असल्याने या कुटुंबाला तालुक्यातील कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आर्थिक मदत दिली.
Published on

Buldhana News : संग्रामपूर तालुक्यात तीन दिवसांपूर्वी काटेल कोलद शिवारात अवैध वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने कोतवालाचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेला कोतवाल अत्यंत सामान्य कुटुंबातील असल्याने या कुटुंबाला तालुक्यातील कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आर्थिक मदत दिली. ही मदत शनिवारी (ता. २०) कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आली.

Financial Help
Agriculture Road : शेतरस्त्याचा असा सुटला प्रश्‍न

एकलारा गावातील लक्ष्मण अस्वार हे कोतवाल म्हणून कार्यरत होते. तीन दिवसांपूर्वी रात्री काटेल कोलद शिवारात वाण नदीपात्रातून वाळूचा उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्याने ते महसूल पथकासह तेथे गेले होते.

Financial Help
Farmer Help : दोन वेळा बैलजोडी चोरी गेलेल्या शेतकऱ्याला नेटकऱ्यांची मदत

अवैध उपशाला पायबंद घालण्यासाठी पथकाने कारवाई करण्याचे धाडस केले. या वेळी ट्रॅक्टर चालकाने कोलवात अस्वार यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने अकोला येथे औषधोपचारासाठी भरती केले गेले. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला.

अस्वार हे अत्यंत सामान्य कुटुंबातील होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे यांनी पुढाकार घेत आर्थिक मदत गोळा केली. ही मदत शनिवारी (ता. २०) तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी भेट देऊन सुपूर्द केली. या वेळी गावातील नागरिक उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com