Maharashtra Politics : शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संसद बंद पाडू; निलेश लंके यांचा एल्गार, सुप्रिया सुळे यांची भाजपवर टीका

Nilesh Lanke And Supriya Sule News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन सोहळा सोमवारी (ता.१०) पार पडला. अहमदनगर (अहिल्यादेवी नगर) शहरात पक्षाचा २५ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नवनिर्वाचित खासदार निलेश लंके आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsAgrowon
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर पहिल्यांदाच दोन्ही गटाच्या वर्धापनदिनाचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी पार पडले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा २५ व्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम अहमदनगर (अहिल्यादेवी नगर) शहरात सोमवारी (ता.१०) पार पडला. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसद बंद पाडू असे म्हटले आहे. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी कांदा प्रश्नावरून भाजपला छेडले आहे. सध्या सुळे यांच्यासह लंके यांच्या वक्तव्यांची जोरदार चर्चा होत आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यासह मोठ्या संख्यने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Maharashtra Politics
Supriya Sule : दूध दरावरून सुप्रिया सुळे भडकल्या; म्हणाल्या, "दूध दर सात दिवसात पुर्ववत करा अन्यथा रस्त्यावर उतरू"

अहमदनगर (अहिल्यादेवी नगर) मध्ये आयोजित वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या सर्व खासदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लंके म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न मोठा होता. तोच प्रश्न महायुतीला महागात पडला. शेतकऱ्यांची नाराजी आणि कांदा निर्यात बंदीचा फटका भाजपसह त्यांच्या मित्र पक्षांना बसला.

दरम्यान आता सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्याच दिवशी पहिलाच निर्णय हा शेतकऱ्यांच्या संदर्भात घेतला. त्यांनवी पीएम किसान सन्मान निधी संदर्भात निर्णय घेत १७ वा हप्ता जारी केला. पण आता संसदेत शेतकऱ्यांच्या मागण्या आणि त्यांचा आवाज कायम घुमणार आहे. आपण आवाज उठवणार आहे. जर भाजपने तो नाही ऐकला. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न नाही सोडवले तर संसद बंद पाडू असा इशाराच लंके यांनी सत्ताधारी मोदी सरकारला दिला आहे.

Maharashtra Politics
Supriya Sule : सुप्रिया सुळे यांची शेतकरी आणि हिंजवडी आयटी पार्कवरून सरकारवर सडकून टीका

तसेच, मी कसाही असलो तरीही पवार यांच्या तालमीत तयार झालो आहे. आता पुढची लढाई ही विधानसभेची असून त्या तयारीला लागायचं आहे. मतदारांनी माझ्यासह ८ जणांना दिल्लीला पाठवलं आता बघा आम्ही कसं काम करतो. संसदेत शेतकऱ्यांचा आवाज उठवणार. जर संसदेत शेतकऱ्यांना न्याय दिला गेला नाही तर संसदच बंद पाडू. आमचं कामचं हटके असतं असेही लंके यांनी म्हटलं आहे.

तसेच सुप्रियाताई सुळे यांनी कांदा प्रश्नानेच भाजपचा वांदा केल्याचे म्हणताना भाजपला छेडलं आहे. यावेळी सुळे म्हणाल्या, लोकसभेमध्ये सर्वात पहिला प्रश्न दुधाच्या भावासाठी मांडण्यात येईल. तर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांचे प्रश्न लोकसभेमध्ये आम्ही सर्व खासदार मांडू. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू. हा शब्द आहे! असे आश्वासन सुळे यांनी दिले. याआधी कांदा प्रश्नावर पियुष गोयल यांना भेटले होते. मात्र त्यांनी तीन जिल्ह्यासाठी मी देशाला वेठीस धरणार नाही असे उत्तर दिले होते. आज याच तीन जिल्ह्यांनी कांदा प्रश्नावरून भाजपच्या मंत्र्यांचा पराभव केला असेही सुळे म्हणाल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com