Rain Update : लोहगावमध्ये सर्वाधिक ५९.८ मिलिमीटर पाऊस

Pune Rain News : सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. १०) दुपारी शहरासह उपनगरांत तसेच जुन्नर, आंबेगाव तालुक्यांत पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली.
Rain Update
Rain Update Agrowon

Pune News : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. १०) दुपारी शहरासह उपनगरांत तसेच जुन्नर, आंबेगाव तालुक्यांत पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह झालेल्या जोरदार पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. शहरात २८ ठिकाणी झाडे पडण्याच्या घटनेमुळ वाहतूक बंद झाली. लोहगाव परिसरात हंगामातील सर्वाधिक ५९.८ मिमी पावसाची नोंद झाली, तर वडगावशेरी, शिवाजीनगर भागांत सर्वाधिक पाऊस झाला.

शुक्रवारी (ता. १०) दिवसभर उन्हाचा चटका आणि अधूनमधून ढगाळ वातावरण होते. दुपारी दोन ते अडीच दरम्यान आकाशात ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. जुन्नर शहर परिसरात दुपारी तीननंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. जुन्नरच्या शिवाई देवी यात्रेचा दुसरा दिवस असताना या यात्रेमध्ये बाहेरगावहून आलेल्या विविध लहान-मोठ्या व्यावसायिकांची मोठी धावपळ उडाली.

Rain Update
Maharashtra Rain : राज्यभरात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज; राज्यात उन्हाचा चटकाही कायम; पावसाचा जोर वाढणार

तालुक्याच्या पूर्व भागातील अणे पठारावर पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाने एक तासात शेतात पाणीच पाणी झाले. काही भागांमध्ये ओढ्याला पाणी वाहिले. अणे, नळवणे, पेमदरा, शिंदेवाडी या भागांमध्ये जोरदार पाऊस झाला, तर बेल्हे, गुळंचवाडी या भागांमध्ये अल्प प्रमाणात पाऊस झाला.

या पावसाने नागरिकांना तात्पुरता उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. वादळी वाऱ्याने कल्याण नगर महामार्गावर अणेजवळ बाभळीचे मोठे झाड पडल्यामुळे महामार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद होता. नागरिकांनी तत्काळ जेसीबीच्या साह्याने हे झाड रस्त्यावरून हटविले आणि वाहतूक पूर्ववत सुरू केली.

तसेच गुळंचवाडीतील तुकाराम देवकर, गणपत देवकर, सुभाष देवकर, रामदास देवकर, शिवाजी कोतवाल यांच्या आंब्याच्या बागेची वादळी वाऱ्याने प्रचंड नुकसान झाले आहे. आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातील पारगाव, पेठ गावांमध्ये तसेच अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, निरगुडसर गावडेवाडी गावांत वादळी वाऱ्यासह हलका अवकाळी पाऊस झाला. तर काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वारे सुटले होते.

Rain Update
Pre Monsoon Rain : मॉन्सूनपूर्व वादळी पावसाचा दणका

शेतकऱ्यांची धावपळ

तालुक्यातील अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, मेंगडेवाडी, निरगुडसर, या परिसरांत शक्रवारी पावसाने हजेरी लावली. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कांदा काढणी, उन्हाळी बाजरी काढणी सुरू होती, ती पिके झाकण्यासाठी धावपळ सुरू होती. तर अनेक ठिकाणी जनावरांसाठी साठवलेला कडबा, वैरण झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव झाली. मात्र या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला.

पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी शनिवारी (ता.११) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

केंद्र --- पडलेला पाऊस

लोहगाव --- ५९.८

वडगाव शेरी --- ३७.५

शिवाजीनगर --- २८.२

चिंचवड --- २६.२

कोरेगाव पार्क --- १९.५

मगरपट्टा --- १३.०

एनडीए --- १२.०

पाषाण --- १०.८

नारायणगाव --- ९.५

निमगिरी ---- ५.५

बालेवाडी --- ४.५

माळीण -- ४.०

हडपसर -- २.५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com