Pre Monsoon Rain
Pre Monsoon Rain Agrowon

Pre Monsoon Rain : मॉन्सूनपूर्व वादळी पावसाचा दणका

Rain Update : वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसाने कसमादे भागातील सटाणा व मालेगाव तालुक्यांत हजेरी लावली.

Nashik News : वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसाने कसमादे भागातील सटाणा व मालेगाव तालुक्यांत हजेरी लावली. त्यामुळे भाजीपाला व आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. नामपूर, आसखेडा, ब्राह्मणपाडे, जायखेडा, परिसरासह मोसम खोऱ्यात गुरुवारी (ता. ९) सायंकाळी चारच्या सुमारास वादळासह झालेल्या मध्यम ते हलक्या पावसाने भाजीपाला, आंबा, उत्पादक शेतकऱ्यांची दैना केली. नामपूर-ताहाराबाद राज्यमार्गालगत अनेक झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीस अडथळा आला.

पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गावठी आंबे, हिरवी मिरची, टोमेटो, वेलवर्गीय भाजीपाला आदी पिके पावसाने बाधित झाली. दरम्यान, कृषी व महसूल विभागाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Pre Monsoon Rain
Pre Monsoon Rain : मराठवाड्यात विविध ठिकाणी पूर्वमोसमी पावसाची हजेरी

मोसम खोऱ्यात सर्वत्र प्रचंड उष्मा जाणवत होता. गुरुवारी दुपारी अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाने हजेरी लावली. उन्हाच्या काहिलीतून दिलासा मिळाला असली तरी शेतकऱ्यांसाठी पाऊसनुकसानकारक ठरला. कांदा भिजू नये यासाठी तो झाकण्याची शेतकऱ्यांची धावपळ सुरू होती.

काढलेला कांदा शेतातच असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पावसाने ओला झालेला कांदा आता विक्री व साठवण्यायोग्य राहिलेला नाही. सध्या बहरलेल्या आंब्याच्या झाडांना लगडलेल्या कैऱ्या वादळामुळे गळून पडल्या. भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज, काकडी या पिकांवरही अवकाळी पावसाचा परिणाम होणार आहे.

Pre Monsoon Rain
Pre Monsoon Rain : विदर्भ, मराठवाड्यासह अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस

वादळामुळे विजेच्या ताराही रस्त्यावर लोंबकळत होत्या. परिसरातील ग्रामस्थ, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आदींनी तातडीने तारांची दुरुस्ती केली. अवकाळी पावसामुळे अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुतर्फा वाळलेली झाडे तोडावीत, अशी मागणी मोसम प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

मालेगाव तालुक्यात सरी

मालेगाव शहर व परिसरात उन्हाचा तडाखा कायम असला, तरी गुरुवारी (ता.९) दुपारी चारनंतर अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन २० ते २५ मिनिटे सरी बरसल्या. पावसाची शक्यता लक्षात घेऊन ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी शेतातील कांदा चाळींमध्ये व प्लॅस्टिकने झाकून ठेवला. मात्र पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली.

बंदिस्त शेडमध्ये लिलाव

नामपूर बाजार समितीमध्ये मजूर टंचाई, पावसाळी वातावरण आदी कारणांमुळे कांद्याचे लिलाव रविवारपर्यंत बंद असल्याने मोसम खासगी मार्केटमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. गुरुवारी (ता. ९) सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. तेथील बंदिस्त शेडमध्ये लिलाव प्रक्रिया झाल्याने शेतकऱ्यांची सोय झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com