PM Swanidhi Scheme : हमीशिवाय कर्ज पुरवठा योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ६३ कोटींच्या पार

PM Swanidhi Yojana Beneficiary : केंद्र सरकार पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत देशातील अनेक छोट्या व्यापाऱ्यांसह कामगारांना कर्जाची रक्कम पुरवली जाते. सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांना ११ हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले असून लाभार्थ्यांची संख्या ६३ लाखांच्या पुढे गेली आहे.
PM Swanidhi Scheme : हमीशिवाय कर्ज पुरवठा योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ६३ कोटींच्या पार
Published on
Updated on

Pune News : देशातील छोट्या आणि कामगारांच्या व्यवसायासासाठी केंद्र सरकार हमीशिवाय कर्जाची सुविधा देते. केंद्र सरकार पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत हे कर्ज उपलब्ध करून देत आहे. सध्या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ६३ लाखांच्या पुढे गेली असून सरकारने लाभार्थ्यांना ११ हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.

पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशातील रस्त्यावर विक्रेते किंवा हातगाड्यांवर व्यवसाय करणाऱ्यांना अल्प कर्ज उपलब्ध करून देते. तर या योजनेचा लाभ लहान आणि मध्यम उद्योजकही घेऊ शकतात. यामुळे याचा आधार रस्त्यावरील विक्रेत्यांसह लहान आणि मध्यम उद्योजांना मिळत आहे.

PM Swanidhi Scheme : हमीशिवाय कर्ज पुरवठा योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ६३ कोटींच्या पार
Swanidhi Scheme : ‘स्वनिधी’तून लघू उद्योजकांचा आर्थिक विकास शक्य

दरम्यान गेल्या आठवड्यात, पंतप्रधान मोदींनी दिल्लीसह सुमारे १ लाखाहून अधिक लाभार्थ्यांना पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम वितरित केली. यात दिल्लीतील ५००० छोट्या व्यावसायिकांचा समावेश होता. तर य

हमीशिवाय ५० हजार रुपयांचे कर्ज

पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत रस्ते, फुथपाथ आणि हातगाड्यांवर व्यवसाय करणाऱ्या ६३ लाख लोकांचे जीवन आनंदी बनवल्याचा दावा देखील सरकारने केला आहे. तसेच या योजनेतून ८३ लाख कर्जाद्वारे ११ हजार कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यात आल्याचा दावा देखील सरकारकडून करण्यात आला आहे.

PM Swanidhi Scheme : हमीशिवाय कर्ज पुरवठा योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ६३ कोटींच्या पार
Rooftop Solar Scheme : रूफ टॉप सोलर बसवा, मोफत वीज मिळवा

योजनेंतर्गत लाभार्थ्याला पहिल्या हप्त्यात १० हजार रुपये दिले जातात. या रक्कमेची परतफेड केल्यानंतर पुन्हा २० हजार रुपये कर्ज म्हणून दिले जाते. याचीही परतफेड केल्यानंतर ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज लाभार्थ्याला दिले जाते. विशेष म्हणजे या रक्कमेसाठी लाभार्थ्याला कोणतीही हमी द्यावी लागत नाही.

योजनेचा लाभ कसा मिळेल

या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, आपल्याला ऑफलाइन बँकांद्वारेच अर्ज करवा लागेल. यासाठी आपल्या जवळच्या कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन तेथे अर्ज करून फॉर्म भरावा लागेल. या अर्जासह काही महत्त्वाची कागदपत्रे जोडावी लागतील. यानंतर अर्जांची छाननीनंतर सर्वकाही योग्य असल्यास आपल्याला कर्जाची रक्कम दिली जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com