CSC Center : सामुदायिक सुविधा केंद्रांमधील व्यावसायिक संधी

Government Business Opportunities : सुविधा केंद्रांच्या माध्यमातून सेवांचे क्षेत्र व त्याच्या मर्यादा, यात वाढ करण्यात आली आहे. आरोग्य, बँकिंग, विमा अशा विविध नागरी जीवनाशी संबंधित क्षेत्रातील आवश्यक सेवांचा समावेश यामध्ये करण्यात येत आहे.
CSC Center
CSC CenterAgrowon

मिलिंद आकरे, हेमंत जगताप

सुविधा केंद्रांच्या माध्यमातून सेवांचे क्षेत्र व त्याच्या मर्यादा, यात वाढ करण्यात आली आहे. आरोग्य, बँकिंग, विमा अशा विविध नागरी जीवनाशी संबंधित क्षेत्रातील आवश्यक सेवांचा समावेश यामध्ये करण्यात येत आहे.

ऑगस्ट २०१५ मध्ये सामुदायिक सुविधा केंद्र २.० मंजूर झाल्यानंतर, २.५ लाख सामुदायिक सुविधा केंद्रांचे स्वयं-शाश्वत नेटवर्क स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्या उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. सुविधा केंद्रामुळे नागरिकांना विविध कागदपत्रे आणि दैनंदिन जीवनातील कामे त्वरित होत असल्याने सुविधा केंद्रांची उपयुक्तता नागरिकांच्या लक्षात आली आहे. सुविधा केंद्र हे एक व्यवसाय म्हणून शेतकरी कंपनी, प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था व महिला बचत गटांचे फेडरेशन यांच्या व्यवसायाच्या केंद्राच्या उभारणीच्या अनुषंगाने काम होणे अपेक्षित आहे. सुविधा केंद्रांच्या माध्यमातून सेवांचे क्षेत्र व त्याच्या मर्यादा, यात वाढत करण्यात आली असून आरोग्य, बँकिंग, विमा अशा विविध नागरी जीवनाशी संबंधित क्षेत्रातील आवश्यक सेवांचा समावेश यात करण्यात येत आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरोग्य सेवा

सुविधा केंद्रामार्फत आरोग्यविषयक विविध सुविधा पुरविल्या जातात. त्याचा नागरिकांना चांगला फायदा होत आहे.

टेलि-मेडिसीन सल्ला

सुविधा केंद्रामार्फत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे टेलि मेडिसीन सल्ला दिला जातो. सुविधा केंद्रामार्फत रुग्णांची नोंद केली जाते. यात रुग्ण थेट डॉक्टरांची वेळ मागू शकतो अथवा थेट सल्ला घेऊ शकतो. त्यानंतर रुग्णास औषधे घेण्याबाबत योग्य सल्ला दिला जातो. अॅलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी बाबत सुविधा केंद्रातून रुग्णाला सल्ला दिला जातो.

आरोग्य, कल्याण औषधे, ओटीसी उत्पादने

होमिओपॅथी, ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक औषधे पुरविणाऱ्या ओवर द काऊंटर सारख्या कंपन्या आणि प्लॅटफॉर्म कडून सुविधा केंद्रामार्फत औषधे आणि आरोग्य उत्पादनांची नागरिकांना विक्री करण्यात येत आहे.

वैद्यकीय पुरवठा

उपकरणे, डिस्पोजेबल्स, वैद्यकीय गॅस पाइपलाइन प्रणाली, फर्निचर, इमेजिंग इत्यादींपासून सर्व प्रकारचा वैद्यकीय पुरवठा सुविधा केंद्राच्या माध्यमातून करता येतो. रुग्णालय, आरोग्य केंद्र, डॉक्टर आणि केमिस्ट इत्यादींना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येत आहेत.

पीएनबी पतंजली रूपे क्रेडिट कार्ड

कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी पीएनबी पतंजली रूपे क्रेडिट कार्ड सुविधा केंद्रामार्फत देण्यात येत आहे.

वेलकम क्युअर वेल्थ पॅकेजेस

वेलकम क्युअर वेल्थ पॅकेज नागरिकांसाठी सुविधा केंद्रामार्फत एक वर्षांसाठी १,४९९ आणि सहा महिन्यांसाठी ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या पॅकेजमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांचा सल्ला व होमिओपॅथिक औषधे उपलब्ध आहेत.

CSC Center
Sugarcane Season : सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे हंगाम आव्हानात्मक

कल्चरल मॅपिंग

सांस्कृतिक मंत्रालयाने ग्राम सांस्कृतिक राजपत्राचा साचा तयार करण्यासाठी “ मेरा गाव मेरा धरोहर” हे सर्वेक्षण सुरू केले आहे. या प्रकल्पांतर्गत ६.५ लाख गावांचे कल्चरल मॅपिंग करून त्यांचे भौगोलिक लोकसंख्या प्रोफाइल आणि क्रिएटिव्ह कॅपिटल बाबतची संकल्पना व त्याबाबतचे नियोजन करण्यात येत आहे. सीएससी-एसपीव्ही ही सुविधा केंद्राचे व्यवस्थापन करणारी यंत्रणा सर्वेक्षणाच्या अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी आहे.

सिएससी ग्रामीण ई-स्टोअर

सिएससी ग्रामीण ई-स्टोअर हा अॅप आधारित क्रांतिकारी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म असून नागरिकांच्या दैनंदिन वापरातील वस्तू, पशूखाद्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरगुती उपकरणे आणि ऑटोमोबाइल उत्पादनांची विस्तृत श्रेणी या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. सुविधा केंद्रामार्फत नागरिकांना अॅपद्वारे विस्तृत उत्पादने विक्री करू शकतात.

टुर्स आणि ट्रॅव्हल्स

सुविधा केंद्रामार्फत नागरिक टुर्स आणि ट्रॅव्हल्स सेवांचा लाभ घेऊ शकतात. यात इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन मार्फत रेल्वे तिकिटे, बस तिकिटे, विमान तिकिटे आणि हॉटेल बुक करणे या सेवा दिल्या जातात. यामध्ये तिकीट बुक करणे , रद्द करणे व पैसे पुन्हा परत देणे या सेवांचा समावेश होतो.

ई- मोबिलिटी आणि स्मार्ट उत्पादने

ग्रामीण ई-मोबिलिटी डीलरशिप सुविधा केंद्रांना उत्पादन निर्मिती करणाऱ्या कंपन्या डीलरशिप व उप डीलरशिप देण्यासाठी मदत करीत आहेत.

स्मार्ट उत्पादने

सुविधा केंद्रामार्फत सर्व प्रकारचे सुरक्षा कॅमेरे (सीसीटीव्ही) कॅमेरे, थर्मल सेन्सर इत्यादी उपकरणे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत.

संपर्क : सुविधा केंद्राबाबत व त्यातील सेवांबाबत काही अडचणी असतील तर त्यासाठी ग्राहक सेवा क्रमांकावर (टोल फ्री क्रमांक, नागरिकांसाठी ०११- ४९७५४९२३/२४ सुविधा केंद्रातील उद्योजकांसाठी १४५९९) संपर्क साधावा. तसेच इतर काही प्रश्नांसाठी helpdesk@csc.gov.in या इमेल वर सुद्धा संपर्क साधावा.

- प्रशांत चासकर, ९९७०३६४१३० (शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी, स्मार्ट महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित, पुणे)

शिक्षण आणि कौशल्य विकास

प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान

प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानाचे उद्दिष्ट ६ कोटी नागरिकांना डिजिटल साक्षरता प्रशिक्षण देणे हा आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र कुटुंबातील एक, अशा एक व्यक्तीस डिजिटल प्रशिक्षण देऊन त्यांना लोकशाही प्रक्रियेत प्रभावीपणे सहभागी होण्यासाठी आयटी क्षेत्राशी संबंधित वापर विशेषत: डिजिटल सेवांचा वापर करून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होऊ शकेल असा प्रयत्न करण्यात येत आहे. सुविधा केंद्रामार्फत पात्र उमेदवारांची नोंदणी, प्रशिक्षण, ऑनलाइन परीक्षा, मान्यताप्राप्त प्रमाणित एजन्सीद्वारे प्रमाणीकरण इत्यादी सेवा डिजिटल साक्षरता अभियानात दिल्या जातात.

CSC Center
Maharashtra Drought : दुष्काळी यादीत सहा तालुक्यांना सरकारचा ठेंगा

स्पर्धा परीक्षांची तयारी

स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंग, रेल्वे, भारतीय वायुसेना गट x आणि y यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी नॅशनल डिफेन्स अकादमी आणि कंबाईन डिफेन्स सर्व्हिसेस कोर्स ऑन कॉम्प्युटर कन्सेप्ट (CCC) , राज्य परिक्षा जसे, की तलाठी, तहसीलदार, लेखापाल इत्यादीसाठी ADDA२४७ यांच्याकडील उपलब्ध प्रशिक्षणाचे आयोजन करणे, याकरिता नागरी सुविधा केंद्रामार्फत सेवा उपलब्ध करण्यात येतात.

आर्थिक लेखा अभ्यासक्रम

नोकरीभिमुख अभ्यासक्रम जसे, की जीएसटी, टॅली, बेसिक इनव्हेंटरी, अकाउंटिंग, स्त्रोतांवर कर कपात इत्यादी अभ्यासक्रम यांचा लेखाविषयक अभ्यासक्रमात समावेश होतो. सुविधा केंद्रामार्फत या अभ्यासक्रमांची नोंदणी केली जाते.

बेसिक कॉम्प्युटर कोर्स

सुविधा केंद्रामार्फत बेसिक कॉम्प्युटर कोर्स सुरू करण्यात आला आहे. उमेदवाराला दैनंदिन जीवनात कॉम्प्युटर वापरण्यास सुसज्ज करण्यासाठी मूलभूत प्रशिक्षण देण्यात येते. तसेच एनआयईएलटी अभ्यासक्रमांसाठी सुद्धा सुविधा केंद्रामार्फत सेवा पुरविण्यात येत आहेत.

एनआयओएस सेवा

या योजनेअंतर्गत ग्रामीण भारतात मुक्त शाळांना प्रोत्साहन देण्यात येत असून विद्यार्थ्यांची नोंदणी आणि शुल्क भरणे यासारख्या सेवा सुविधा केंद्रामार्फत देण्यात येत आहेत. प्रवेश आणि निकालांची माहिती सुविधा केंद्रामार्फत उपलब्ध होऊ शकते.

इंस्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स मिश्रित शिक्षण कार्यक्रम

इंस्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स मिश्रित शिक्षण कार्यक्रम हा ४५ तासांचा आहे. ऑनलाइन प्रशिक्षण आणि मूल्यांकनासह अल्पकालीन कौशल्य वृद्धिंगत अभ्यासक्रमासह उद्योगांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक अनोखा कार्यक्रम आहे. सुविधा केंद्रामार्फत अभ्यासक्रम नोंदणी, शुल्क भरणे व प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे या सेवा पुरविण्यात येतात.

इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड कार्यक्रम

स्प्रिंगबोर्ड प्लॅटफॉर्म कार्यक्रमांतर्गत उपलब्ध असलेल्या विविध कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना डिजिटल कौशल्य आणि जीवन कौशल्य प्रदान करण्यासाठी इन्फोसिस कंपनीसोबत भागीदारी करण्यात आली असून सुविधा केंद्रामार्फत नोंदणी व प्रमाणपत्र या सेवा देण्यात येतात. त्याचप्रमाणे डिप्लोमा इन कॉम्प्युटर अॅप्लिकेशन सारखे सहा महिन्यांचे कोर्स, विद्याकुल ऑनलाइन कोचिंग क्लासेस ज्यामध्ये केंद्र व राज्यशासनाचे विविध अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन, जिडी गोयंका विद्यापीठाचे प्रवेशासाठीचे अर्ज, टॅली अभ्यासक्रमाचे प्रवेशासाठीचे अर्ज याबाबतची कामे सुद्धा सुविधा केंद्रामार्फत केली जातात.

सुविधा केंद्र चालविण्याचा अभ्यासक्रम नोंदणी व प्रवेश याबाबतचे मार्गदर्शन केले जाते. याला टेली सेंटर उद्योजक कोर्स संबोधले जाते. स्टॉक मार्केट मधील माहितीच्या अनुषंगाने विविध कौशल्य शिकविण्याच्या पद्धती बाबतची माहिती व प्रशिक्षणाची नोंदणी याबाबत सुविधा केंद्रामार्फत साहाय्य केले जाते. सुविधा केंद्रामार्फत बाल विद्यालय, ऑलिम्पियाड, गणितविषयक अभ्यासक्रम, उद्योजकता विषयक अभ्यासक्रम, सेट टॉप बॉक्स बसविणे व त्याचे रिचार्ज, चारचाकी व दुचाकी पोहचविण्याबाबत व्यवस्थापन, शिवणकाम व टेलरिंग कोर्स, व्यक्तिमत्त्व विकास कोर्स, ग्रामीण भागातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत पोर्टल, राष्ट्रीय करिअर सेवा, संरक्षण पेन्शन सेवा पोर्टल , स्त्री स्वाभिमान उपक्रम की ज्यामध्ये महिलांना बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन तयार करण्याचे युनिट सुरु करण्याबाबतची प्रक्रिया , डाक मित्र, ई-साईन, सीबील अहवाल अशा विविध सेवा सुविधा केंद्रामार्फत देण्यात येत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com