Livestock Census : राज्यात मोबाईल ॲपद्वारे होणार पशुगणना, उद्यापासून योजना होणार सुरू

Mobile App : राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून १ सप्टेंबरपासून पशुगणना करण्यात येणार आहे. यावर्षी होणारी पशुगणना २१ वी होणार आहे.
Livestock Census
Livestock Census Agrowon
Published on
Updated on

Maharashtra Animal Husbandry Department : राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून १ सप्टेंबरपासून पशुगणना करण्यात येणार आहे. यावर्षी होणारी पशुगणना २१ वी असून, ती एकाच वेळी संपूर्ण राज्यात राबविली जाणार आहे. प्रथमच ऑनलाईन पद्धतीने मोबाईल ॲपच्या माध्यमातून होणारी ही पशुगणना चार महिने चालणार आहे. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाने जय्यत तयारी केल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. महेश शेजाळ यांनी दिली.

पशुसंवर्धन विभागाकडून दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. देशातील जनतेची जशी जनगणना केली जाते, त्या धर्तीवरच ही मोहीम राबवली जाते. यावर्षी १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ही पशुगणना होणार असून, ती पूर्णपणे पेपरलेस आहे. पशुगणनेसाठी यंदा पहिल्यांदा स्मार्टफोनचा वापर केला जाणार आहे.

२०१९ मध्ये झालेल्या २० व्या पशुगणनेसाठी प्रगणकांना टॅबलेट दिले होते, तर त्यापूर्वीची पशुगणना नोंदवहीत केली जात होती. नोंदवहीत अनेक रकाने होते. ते भरताना बराच वेळ जात असे. मात्र, यावर्षी होणाऱ्या पशुगणनेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी तसेच वेळेची बचत होण्यासाठी एका विशिष्ट ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. त्याच्या माध्यमातूनच सॉफ्टवेअरवर पशुधनाची माहिती भरली जाणार आहे.

यासाठी पशुसंवर्धन विभागाने पशुधन पर्यवेक्षक पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व्यक्तींची प्रगणक म्हणून नेमणूक केली आहे. या प्रगणकांना डॉ. शशांक कुलकर्णी यांनी डॉ. शेजाळ, डॉ. बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन पंधरवड्यात तालुकानिहाय मार्गदर्शन केले आहे.

Livestock Census
Gokul Milk Union Meeting : 50 लिटरची अट वगळणारा सूर्याची पिसाळ कोण?; गोकुळ वार्षिक सभास्थळी पोस्टर वॉर

पशुगणना मोहिमेत गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी, मेंढी, कुक्कुट, अश्व, वराह, पाळीव कुत्री, भटकी जनावरे, पशुपालन वापरली जाणारी यंत्रसामग्री यांची गणना केली जाणार आहे. गणना केलेल्या आधारावरच शासनाकडून विविध धोरण योजना आखल्या जातात. तसेच निधीची उपलब्धता केली जाते.

प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. महेश शेजाळ म्हणाले की, पशुधनाची माहिती घेण्यासाठी प्रगणक येतील त्यावेळी नागरिकांनी त्यांना वस्तुनिष्ठ व खरी माहिती द्यावी. दिलेल्या माहितीच्या आधारे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे, त्यानुसार लसीकरण औषधांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे चुकीची माहिती देऊ नये. सर्वांनी पशुगणनेसाठी सहकार्य करावे.

ग्रामीण भागासाठी २०५ प्रगणक नियुक्त

ग्रामीण भागासाठी दर तीन हजार कुटुंबांमागे एक, तर शहरी भागासाठी चार हजार कुटुंबांमागे एक अशी प्रगणकांची नियुक्ती केली आहे. तीन प्रगणकांमागे एका पर्यवेक्षकाची नेमणूक केली आहे. यातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १२५५ गावांसाठी २०५ प्रगणक व ६१ पर्यवेक्षक असून, शहरी भागासाठी ७६ प्रगणक व २१ पर्यवेक्षक असे एकूण २८१ प्रगणक व ८२ पर्यवेक्षक नेमले आहेत. प्रगणकांनी पशुगणनेची माहिती भरताना स्वतःचा मोबाईल वापरावयाचा असून, त्यासाठी त्यांना मानधन दिले जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com