Maharashtra Rain : तीन जिल्ह्यात १६३ मंडलात पावसाची हलकी, मध्यम हजेरी

Marathwada Rain : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यातील १९५ मंडलांपैकी १६३ मंडलात सोमवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासात पावसाची तुरळक, हलकी, मध्यम हजेरी लागली.
Rain In Maharashtra
Rain In MaharashtraAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यातील १९५ मंडलांपैकी १६३ मंडलात सोमवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासात पावसाची तुरळक, हलकी, मध्यम हजेरी लागली. काही मंडलात दमदार पाऊस झाला. पावसाची नितांत आवश्यकता असलेल्या काही मंडलात या पावसाने मोठा दिलासा देण्याच काम केले आहे.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील ८३ मंडलांपैकी ७४ मंडलांमध्ये तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील चिकलठाणा, करमाड, पैठण तालुक्यातील ढोरकीन, वैजापूर तालुक्यातील वैजापूर, शिऊर, लोणी खुर्द, जानेफळ, सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड, निल्लोड, आदी मंडलातील पाऊस दमदार राहिला.

Rain In Maharashtra
Rain Update : पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस

जालना जिल्ह्यातील ४९ मंडलांपैकी ३३ मंडलांमध्ये तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यातील वरुड बुद्रूक, जालना ग्रामीण, मंडलात पावसाची हजेरी दमदार राहिली. बीड जिल्ह्यातील एकूण ६३ पैकी ५६ मंडलात तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यातील सीरसदेवी, पाटोदा (म), नांदुरघाट, पाली, पिंपळनेर मंडलांतील पाऊस मध्यम ते दमदार स्वरूपाचा राहिला. प्रदीर्घ विश्रांतीनंतर पडलेल्या या पावसाने पिकाला दिलासा देण्याचे काम केले आहे.

Rain In Maharashtra
Heavy Rain : नगर जिल्ह्यात दमदार पावसामुळे ६६ टँकर बंद

जिल्हानिहाय पावसाची मंडले (पाऊस मिलिमीटरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर जिल्हा :

छत्रपती संभाजीनगर १८.५, भावसिंगपुरा २३, चिकलठाणा ४९.३, करमाड ४०.३,हर्सूल ५.८, चौका १३.५, कचनेर १५, शेकटा १४.५, वरुडकाजी ५.८, पिंपळवाडी २०.३, ढोरकीन ४४.५, गंगापूर ७.५, आसेगाव ८.८, जामगाव ७.५, वैजापूर ५४.८, शिऊर २९. ८, लोणी खुर्द २०.३, लाडगाव १७, जानेफळ ४३, बाबतारा २०.३, चिकलठाणा ५.८, पीशोर ३६, नागद ७.५, वेरूळ ७, सुलतानपूर १३.५, बाजारसावंगी ७, सिल्लोड ५२.३, निल्लोड २२.३, भराडी १७, शिवना ६.८, सोयगाव ६.८, बनोटी १७.५, फुलंब्री ९.५, आळंद ३०.८, पिरबावडा १०, वडोद बाजार ११.५, बाबरा १५.५.

जालना जिल्हा :

भोकरदन ५.८, धावडा ८.५, अनवा ७, कुंभारझरी १५.८, वरुड बुद्रूक ३४.८, जालना ग्रामीण ४४.८, विरेगाव ५.८, गोंदी २०.३, रोशनगाव ९, रांजणी १५

बीड जिल्हा :

बीड ८.५, पाली २६, म्हालसाजवळा ७.८, नाळवंडी १७, राजुरी नवगण ८.५, पिंपळनेर ५०, टाकळसिंग १५.८, दौलावडगाव १३.८, पाचेगाव ५.३, सिरसदेवी २५.३, माजलगाव १४.३, किट्टीआडगाव १६.८, तालखेड १०.५, पाटोदा म २२.३, होळ १७, विडा ११, नांदूर घाट २५.८, कौडगाव १०.५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com